
पारोळा रोडवर अज्ञात वाहनाच्या धडकेत यूपीतील मजूर ठार
धुळे (विजय डोंगरे ):सुरत नागपूर महामार्गावर पंकज हॉटेल समोर अज्ञात वाहनाच्या धडकेत पारोळा रोडवर दुचाकी स्वार ठार.
याबाबत मिळालेली माहिती की, बहादूर दिप्पल गौतम हे चोपडा येथे त्यांचे भावाच्या घरी कामा निमित्त भेटायला गेले होते. भेट झाल्यानंतर चोपडाहुन सायंकाळी परत मोटर सायकल हिरो होंडा क्रमांक एम एच 19/ बी बी 8262 ने धुळ्याकडे परत येत असताना सुरत नागपूर महामार्गावर पारोळा रोडवरील हॉटेल पंकज समोरील रस्ता वर धुळे हुन जळगाव कडे जाणाऱ्या दुचाकीस जोरदारपणे धडक दिली. यात बहादूर दिप्पल गौतम हे दुचाकीवरून रस्त्याच्या बाजूला फेकले गेले .व ते रक्तबंबाळ झाले.रस्त्याच्या आजूबाजूला नागरिकांनी अपघात झाल्याचे पहाताच मदतीसाठी पुढे सरसावले व तातडीने त्यांनी जखमी व्यक्तीला उपचारार्थ चक्करबर्डी येथील भाऊसाहेब हिरे मेडिकल कॉलेज रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तपासणी करून त्यांना मृत घोषित केले.
या नंतर मृतदेह नातेवाईक व नागरिकांच्या मदतीने पोस्टमार्टम साठी पाठवण्यात आला.
मृत व्यक्तीची ओळख पटली आहे.त्यांचे नाव बहादूर दिप्पल गौतम वय 35 आहे.मजूरी व्यवसाय करण्यासाठी आले होते.ते मुळचे राहणारे उत्तर प्रदेशातील आहे. त्यातच त्यांचा अपघातात मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. अपघाताबाबत तालुका पोलिसात गुन्हा नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत सुरू होते.