तापी पुलाचा कठडा तोडून अज्ञात वाहन पाण्यात पडल्याची आशंका!

Featured धुळे
Share This:

 

शिरपूर (तेज समाचार प्रतनिधि). शुक्रवारच्या पहाटे धुळ्याकडून शिरपूरकडे भरधाव वेगाने येणारे अज्ञात वाहन मुंबई-आग्रा महामार्गावरील सावळदे पुलाचा कठडा तोडून पाण्यात पडल्याची दुर्दैवी घटना पुन्हा घडली़ सदर वाहन नेमके कोणते ते समजू शकले नसले, तरी काही लोकांना नदीत पडलेले वाहन लक्झरी बस असल्याची भिती व्यक्त केली जात आहे़.

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार शुक्रवार २८ रोजी पहाटे २ ते 3 वाजेच्या दरम्यान हे वाहन धुळ्याकडून येत असतांना सदर चालकाला डुलकी लागल्यामुळे तापी पुलाचे कठडे तोडून ते वाहन पाण्यात पडल्याची आशंका व्यक्त होत आहे. सदरचे वृत्त महामार्ग पोलिसांना कळताच त्यांनी लागलीच घटनास्थळी येवून पहारा ठेवला आहे़. मात्र तापी नदी दुथडी भरून वाहत असल्याने काहीच कळत नाही़. परंतु पुलाचे कठडे मोठ्या प्रमाणावर तुटल्यामुळे मोठे वाहन असल्याचा अंदाज केला जात आहे़.

या दुर्घटनेच्या अपडेट वर तेज समाचार नजर रोखुन आहे. अपडेट मिळाल्यावर लगेच आम्ही ते आपल्या पर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करू…

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *