
केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात-पत्नीचा जागीच मृत्यू
मुंबई (तेज समाचार डेस्क): केंद्रीय मंत्री श्रीपाद नाईक यांच्या गाडीला अपघात झाला आहे. कर्नाटक कारवार इथल्या अंकोला याठिकाणी हा अपघात झालाय.
या अपघातात मंत्री श्रीपाद नाईक यांच्या पत्नी विजया नाईक तसंच त्यांचा बॉडीगार्डचा जागीच मृत्यू झालाय. तर श्रीपाद नाईक जखमी झालेत.
नाईक यांच्यावर जवळच्या रूग्णालयात उपचार सुरु आहेत. येलापूरहून गोकर्ण येथे जात असताना हा अपघात झालाय.
पोलिसांनी या अपघातासंदर्भात गुन्हा दाखल केला असून करत अधिक तपास सुरुये.