
यावल परिसरात नदीपात्रात अनधिकृत विट भट्ट्या तहसीलदार, सर्कल, तलाठी यांचे दुर्लक्ष
यावल परिसरात नदीपात्रात अनधिकृत विट भट्ट्या तहसीलदार, सर्कल, तलाठी यांचे दुर्लक्ष
यावल (तेज समाचार प्रतिनिधि): यावल तहसीलदार ,यावल मंडळ अधिकारी, यावल तलाठी, आणि यावल नगरपरिषद या सर्व कार्यालयापासून एक किलोमीटर अंतराच्या आत असलेल्या नदीपात्रातील अनधिकृत विट भट्ट्या कडे संबंधित सर्व शासकीय यंत्रणेचे दुर्लक्ष होत असल्याने यावल शहरासह परिसरातील नागरिकांचे व शालेय विद्यार्थ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
येथील शासकीय विश्रामगृह आणि डॉक्टर झाकीर हुसेन विद्यालय परिसराला लागून असलेल्या नदीपात्रात आणि यावल महसूल तसेच यावल नगरपालिका कार्यक्षेत्रातील नदीपात्रात आणि नदीकिनाऱ्यावर असलेल्या काही अनधिकृत विट भट्ट्या खुलेआम सुरू आहेत या परिसरात उर्दू हायस्कूल, डॉक्टर जाकिर हुसेन विद्यालयातील विद्यार्थी, विद्यार्थिनी तसेच आजूबाजूस मोठ्या संख्येने नागरिकांचे रहिवासी क्षेत्र आहे विट भट्ट्या सुरू आहेत त्यापैकी अनेक विटभट्टी चालकांनी महसूल विभाग आणि प्रदूषण विभागाचे सर्व नियम, अटी, शर्ती ची पायमल्ली केली आहे यामुळे संपूर्ण परिसरासह यावल करांचे आरोग्य धोक्यात आले आहे.
यावल नगरपरिषद कार्यक्षेत्रात आणि महसूल कार्यक्षेत्रात नदीपात्रात आणि नदीकिनाऱ्यावर वीट भट्ट्या सुरू करण्याची परवानगी संबंधित शासकीय यंत्रणेने दिली कशी ? याबाबत यावल शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून फैजपुर उपविभागीय अधिकारी डॉक्टर अजित थोरबोले, तहसीलदार जितेंद्र कुंवर, मंडळ अधिकारी तडवी, आणि यावल तलाठी सूर्यवंशी यांनी संयुक्तरित्या तात्काळ कार्यवाही करून नदीपात्रातील आणि नदी किनाऱ्यावरील दिसत असलेल्या वीटभट्ट्या तात्काळ बंद करण्याची कार्यवाही करून नदीपात्र मोकळे करावे जेणेकरून पावसाळ्यात कोणत्याही प्रकारची जिवीत या वित्त आणि होणार नाही असे संपूर्ण शहरात बोलले जात आहे.