‘उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला’- अर्णब गोस्वामी गरजले

Featured मुंबई
Share This:

‘उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला’- अर्णब गोस्वामी गरजले

मुंबई  (तेज समाचार डेस्क): वास्तुसजावटकार अन्वय नाईक (Anvay Naik) यांना आत्महत्येसाठी प्रवृत्त केल्याप्रकरणी अटक करण्यात आलेल्या रिपब्लिक वाहिनीचे मुख्य संपादक अर्णब गोस्वामी यांना अखेर सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) जामीन मंजूर केला. अर्णब गोस्वामी (Arnab Goswami) यांच्यासहित इतर दोन आरोपींनाही जामीन देण्यात आला. न्यायालयानं प्रत्येकी ५० हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांची तात्काळ सुटका करण्याचे आदेश दिले होते. सुटका झाल्यानंतर अर्णब गोस्वामी हे आपल्या न्यूज रूममध्येही पोहोचले. यावेळी पुन्हा त्यांनी आक्रमक भूमिका घेत थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना आव्हान दिलं. ‘उद्धव ठाकरे तुमचा पराभव झाला आहे’, असं म्हणत त्यांनी थेट ही ते यावेळी म्हणाले. उद्धव ठाकरे तुम्ही मला जुन्या प्रकरणात अटक केली आणि माझी माफीही मागितली नाही. खेळ तर आता सुरू झाला आहे,” असंही अर्णब गोस्वामी यावेळी म्हणाले. तसंच आता प्रत्येक भाषेत रिपब्लिक टीव्ही सुरू करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली. तसंच आंतरराष्ट्रीय माध्यमांमध्येही आपली उपस्थिती असल्याचं ते म्हणाले. “मी तुरूंगाच्या आतूनही वाहिनी सुरू करेन आणि तुम्ही काहीही करू शकणार नाही, असंही त्यांनी आक्रमक होत म्हटलं. तसंच अंतरिम जामीन दिल्याप्रकरणी गोस्वामी यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभारही मानले.

दरम्यान, अर्णब गोस्वामी यांना अंतरिम जामीन दिल्यानंतर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनीदेखील न्यायालयाच्या निर्णयाचं स्वागत केलं. तसंच महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकाला त्यांची जागा दाखवून दिल्याचंही म्हटलं. दरम्यान, सरकारनं राज्यात आणीबाणीसारखी परिस्थिती निर्णय केल्याचाही आरोप त्यांनी यावेळी केला.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *