गोदावरी कॉलेजच्या बेजबाबदारपणामुळे 2 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

Featured जळगाव
Share This:

साकळी गांवात आठवडे बाजारासह कोरोनाचा भरला मोठा बाजार.

गोदावरी कॉलेजच्या बेजबाबदारपणामुळे दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह

 यावल  ( सुरेश पाटील ): तालुक्यातील साकळी गांवात दर रविवारी आठवडे बाजार भरतो असतो गेल्या आठ दिवसापासून साकळी गांवात कोरोना विषाणूने मोठा हाहा:कार माझविला असला तरी साकळी गांवात मोठ्या उत्साहात आणि मोठ्या गर्दीत आत्मविश्वासाने आज रविवार रोजी आठवडे बाजार भरला. ही साकळी ग्रामस्थांच्या आरोग्य हिताच्या दृष्टिने फार मोठी गंभीर व चिंतनीय घटना आहे.
कारण साकळी गांवात आज दिनांक 5 जुलै 2020 रविवार रोजी संध्याकाळी कोरोना पॉझिटिव्ह एकूण 8 रुग्ण आढळून आले आहेत त्यामुळे साकळी गांवातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या 63 झाली आहे. यावल शहरात आतापर्यंत फक्त 42 रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत यावल शहराची व साकळी गांवाची लोकसंख्या लक्षात घेता साकळी गांवात कोरना विषाणुने आपला उच्चाकं गाठला आहे. त्यामुळे साकळी ग्रामस्थांच्या आरोग्य हिताच्या दृष्टिकोनातून संपूर्ण आरोग्य विभागाने, महसूल व पोलिस प्रशासनासह साकळी गांवातील प्रमुख समाजसेवकांनी ठोस निर्णय घेऊन कडक कारवाई करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
यावल तालुक्यात आज फैजपूर येथे 4 , म्हैसवाडी 2 , डांभुर्णी 2 , कोरपावली येथे 2 आणि साकळी येथे 8 असे एकूण 18 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले आहेत.
गोदावरी कॉलेजमधून संशयीत कोरोना ग्रस्त रुग्णाचे शव अंत्यविधी करण्यासाठी नातेवाइकांना ताब्यात दिल्याने मयताच्या घरातील दोन रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले असल्याने गोदावरी कॉलेजचा अक्षम्य बेजबाबदारपणा उघडकीस आला असल्याने जिल्हाधिकारी जळगाव यांनी गोदावरी कॉलेज कडे आपले लक्ष केंद्रित करून कडक कार्यवाही करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *