
धुळ्यात १२ तासात दोन करोनाबाधितांचा मृत्यू
धुळे (तेज समाचार डेस्क) : शहरातील हिरे मेडीकलच्या विलगीकरण कक्षात दाखल असलेल्या मालेगाव आणि साक्री येथील दोघांचे रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आल्यामुळे आरोग्यासह प्रशासकीय यंत्रणेची धावपळ उडाली. गुरुवारी साक्री शहरातील ५५ वर्षी प्रौढ व्यक्ती जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी आली हाेती. त्याच्या स्वॅबचा नमुना तपासणीसाठी पाठविला हाेता. मात्र शुक्रवारी पहाटेपूर्वी १.३० वाजता उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. त्यापाठोपाठ मालेगाव येथील एक २२ वर्षीय तरुणी आज सकाळी उपचारा दरम्यान दगावली आहे. दि.७ एप्रिल रोजी अनेमिया या आजाराने त्रस्त असल्याकारणाने तिला धुळे येथील शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.
तरुणीला हिरे वैद्यकीय महाविद्यालातील अलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले होते तिच्यावर उपचार सुरु असताना आज तिचा मृत्यू झाला १२ तासात २ करोना पॉझिटिव्ह आणि दोघांचाही मृत्यू झाल्याने आरोग्य यंत्रणेची झोप उडाली आहे. सदर तरुणी अनेमीया या आजाराने त्रस्त होती. तिला उपचारासाठी मालेगाव येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. मात्र सदर तरुणीला अधिक उपचारासाठी अतिदक्षता विभागात ठेवणे गरजेचे असल्याने व सामान्य रुग्णालयातील अतिदक्षता विभाग करोना संसर्ग रुग्णांसाठी राखीव असल्याने तिला धुळे येथील हिरे शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले होते.