
चोपड्यातून 30 परप्रांतीय मजुरांना घेऊन दोन बसेस रवाना
चोपड्यातून तीस परप्रांतीय मजुरांना घेऊन दोन बसेस रवाना
चोपडा (तेज समाचार प्रतिनिधी ) : मबुईहुन ट्रक मध्ये प्रवास करून चोपड्यात आलेल्या मध्यप्रदेशातील मजूराना आज दि १० रोजी संध्याकाळी ५:३० वाजता तहसीलदार यांच्या नेतृत्वाखाली दोन बसेस मध्ये ३० मजुरांना मध्यप्रदेशच्या सीमेवर चोरवळ ता रावेर येथे पाठविण्यात आले
सविस्तर असे की, परिवहन मंत्री अनिल परब यांच्या आदेशानुसार स्थलांतरित मजुरांसाठी विनामुल्य बसेस पाठविण्यात यावे असा आदेश आज रोजी प्राप्त झाला आणि दुपारी मबुईहुन चोपड्यातुन हे मजूर प्रवास करीत असताना पोलिसांनी हटकले असता संबंधित ट्रक ड्रायव्हरने मजुरांना चोपड्यातच सोडून दिले त्या मजुरांना तहसीलदार अनिल गावित यांनी डेपो मॅनेजर संदेश क्षिरसागर यांच्याशी संपर्क साधून दोन बसेस सोडण्याचा निर्णय घेतला यावेळी दोघ बसला सॅनिटायझर करून एका बस मध्ये एका सिटवर एक प्रवाशी या सोशल डिस्टिंगचा नियम पाळत प्रवाश्यांना बसविण्यात आले यावेळी या मजुरांची मेडिकल चेकिंग, सॅनिटायझर करून, त्यांना बिस्कीट पुडे, पाणी बॉटल, नमकीन पॉकेट, असा खाऊ ही देण्यात आले या दोन्ही बसवर आर.जी.बोरसे,एस.एम.पाटील,चालक म्हणून गेले आहेत यावेळी महसूलचे लियाकत तडवी, प्रदीप बाविस्कर, जितेंद्र धनगर, राजेंद्र पाटील, प्रशांत विसावे तसेच ए. टी. पवार,डी. डी. चावरे, अनिल बाविस्कर, संभाजी पाटील, बी.एस.सुर्वे , सागर बडगुजर, बजरंग महाजन आदी हजर होते बसेस निघाल्यानंतर बस स्थानक परत न.पा.कर्मचाऱ्यांकडून सॅनिटायीझ करण्यात आले