यावल येथील दोन मुलं पाटात वाहून गेली शोध सुरू

Featured जळगाव
Share This:

यावल येथील दोन मुलं पाटात वाहून गेली शोध सुरू

यावल (सुरेश पाटील): यावल शहरातील दोन मुलं काल दि.5दुपारी दुपारी पाटात वाहून गेल्याने त्यांचा शोध सुरू आहे यामुळे यावल शहरात एकच खळबळ उडाली आहे यावल शहरातील समाजसेवक गणेश महाजन व त्यांच्या वार्डातील नागरिक पाटात वाहून गेलेल्या मुलांचा शोध घेत आहेत.
काल दुपारच्या सुमारास बोरावल रस्त्याकडील पाटावर पोहण्यासाठी गेलेले यावल शहरातील युवराज निलकंठ दुसाने वय15दीपक जगदीश शिंपी वय13परंतु त्यांना पाण्याचा अंदाज न आल्याने ते पाटात पाटाच्या पाण्याने काल दुपारी वाहून गेले त्यातील त्यांच्यासोबत असलेले दोन जण बघून घाबरून घरी पळून आले. त्यांनी उशीराने संध्याकाळी बेपत्ता मुलांच्या घरी घडलेली घटना सांगितल्याने एकच खळबळ उडाली त्यावेळपासून दोघांचा शोध सर्वत्र सुर आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *