
जळगाव जिल्ह्यात दिवसभरात पंचवीस कोरोना बाधित
जळगाव, दि. 8 – जिल्ह्यातील अमळनेर, चोपडा, जळगाव, भुसावळ, रावेर, जामनेर येथे स्वॅब घेतलेल्या 170 कोरोना संशयित व्यक्तीचे नमुना तपासणी अहवाल आज दिवसभरात प्राप्त झाले आहे. यापैकी 145 व्यक्तीचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून पंचवीस व्यक्तींचे तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले आहे.
पॉझिटिव्ह आढळलेले रूग्णांमध्ये भुसावळ येथील पाच, चोपडा येथील दोन, अमळनेर येथील सोळा तर मेहरूण व ममुराबाद (जळगाव) येथील दोन रूग्ण असे एकूण पंचवीस रूग्णांचा समावेश आहे.
जिल्ह्यात आजपर्यंत कोरोना बाधित रूग्णांची संख्या 125 इतकी झाली असून त्यापैकी अठरा रूग्णांचा मृत्यू झाला आहे. तर तीन रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. अशी माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे.