
शिरपुर : तापी नदीत पड़लेले ते वाहन ट्रक असल्याची शक्यता
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि). आज सकाळी तापी नदीचा कठडा तोडून एक वाहन नदीत पडल्याची आशंका व्यक्त केली जात होती, पण ते वाकन नेमक कोणत, या विषयी शंका कुशंका व्यक्त होत होत्या. कोणाला वाटत होत कि ते वाहन ट्रैवल्स बस होती, तर कोणी ट्रक पडल्याची आशंका व्यक्त करीत होते. पण आता एसडीआरएफच्या दलाने ने घटनास्थळाचा ताबा घेतल्या नंतर आणि नदीत शोध घेतल्या नंतर एका ट्रक चे काही पार्ट्स सापडले. तरी अजून एसडीआरएफ कडून या गोष्टिची पुष्टी केल्या गेली नाही. नदी मध्ये पाण्याचा तीव्र प्रवाह असल्याने ट्रक आणि त्याचा चालक, वाहक वाहून गेल्याची आशंका व्यक्त केली जाता आहे. नदी मध्ये सध्या शोध चालू आहे. सोबतच ट्रकच्या चालक, वाहक चा पण शोध घेतल्या जात आहे.