धुळे (तेजसमाचार प्रथिनिधी): महिला सरपंच यांना विकास निधीच्या कामातून टक्केवारी द्या. व अपशब्द वापरत कुटुंबीयांना ठार करु धमकविले तीन जण फरार. खोरी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच यांना विकास निधीच्या कामातून पंचवीस हजारांची रोख रक्कम द्यावी अन्यथा तुमची बदनामी करू जातिवाचक शिवीगाळ करून मारून टाकण्याची धमकी दिली.याप्रकरणी ह.म.साक्री येथे रा. महिला सरपंच सविता रमेश ब्राम्हणे यांनी खोरी गावातील रा.शिंदे कुटुंब तिघांन विरुद्ध लेखी तक्रार दाखल केली. निजामपूर पोलीस ठाण्यात तिघा विरुध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार खोरी ग्रामपंचायतीच्या महिला सरपंच सविता ब्राह्मणे व त्यांचे पती रमेश ब्राह्मणे व सहकारी यांना संगनमताने ग्रामपंचायत विकास निधीतून रोख 25 हजार रुपये (खंडणी) व विकास निधीतून टक्केवारी द्यावी. खंडणी मागून जातीवाचक गल्लीच्छ शब्द वापरून परिवारास मारून टाकण्याची धमकी दिली. सरपंच महिला यांचे नातेवाईक आजारी असल्याने त्या तातडीने बाहेरगावी निघून गेल्या होत्या व आज परत आल्यानंतर त्यांनी लेखी फिर्यादीत शिंदे कुटुंबियांनी विरुद्ध गुन्हा नोंदवला.
यातील आरोपी अद्यापही फरार आहेत. १)मनीषा गुलाबराव पाटील( शिंदे) २) गुलाबराव नारायण पाटील ( शिंदे) ३) प्रेम राज गुलाबराव पाटील ( शिंदे) तिघांविरुद्ध सरपंच महिलांना धमक केल्याप्रकरणी व विकास कामात टक्केवारी व रोख रक्कम 25,000 (खंडणी ) गल्लीच्छ शब्द वापरून कुटुंबीयांना मारून टाकण्याचे धमकावले या प्रकरणी गुन्हा नोंद करण्यात आला आहे पुढील तपास निजामपूर पोलिस करीत आहे.