बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गावर खड्ड्यांमध्ये 26 जानेवारी 2019 रोजी वृक्षारोपण करणार

Featured जळगाव
Share This:

बऱ्हाणपूर -अंकलेश्वर महामार्गावर खड्ड्यांमध्ये 26 जानेवारी 2019 रोजी वृक्षारोपण करणार

यावल तालुका भाजपातर्फे इशारा

यावल(सुरेश पाटील): बऱ्हाणपूर -अंकलेश्वर तथा यावल चोपडा रस्त्यावर /महामार्गावर यावल येथील बुरुज चौकात आणि ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत हे खड्डे सार्वजनिक बांधकाम विभाग यावल यांच्यातर्फे बुजवण्यात न आल्यामुळे वाहनधारकांना पायदळ चालणाऱ्यांना मोठा अडथळा निर्माण होऊन कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे.रस्त्यावर जागोजागी खडी,दगड उखडून पडलेले असल्यामुळे वाहनांच्या टायरच्या दाबामुळे अनेकांच्या दुकानात आणि अंगावर दगड फेकले जात असल्यामुळे लोकांमध्ये भितीचे वातावरण निर्माण झाले आहे.तरी यावल येथील सार्वजनिक बांधकाम उपविभागीय विभागाने रस्त्यावरील खड्डे तात्काळ न बुजवील्यास 26 जानेवारी 2021
मंगळवार रोजी यावल तालुका भारतीय जनता पार्टी तर्फे रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येणार असल्याचे निवेदन तथा इशारा देण्यात आला आहे.
सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल उपविभागीय अधिकारी यांना दिनांक 22 जानेवारी 2021 रोजी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,यावल शहरातील यावल ते चोपडा रस्त्यावर अनेक ठिकाणी मोठे जीवघेणे खड्डे पडलेले आहेत सदर खड्ड्यांमध्ये बऱ्याच वेळा लहान -मोठी वाहने फसुन जातात किंवा नादुरुस्त होतात व ट्राफिक जाम होते तसेच खड्ड्यांमधील दगड हे टायरच्या दबाव आणि इकडे तिकडे उडून आजूबाजूस असलेल्या लोकांना इजा करतात त्यामुळे वाद उत्पन्न होतात यावल शहरातील बुरुज चौकात मोठा खड्डा पडलेला असून तो व इतर सर्व खड्डे ताबडतोब बुजवावे अन्यथा यावल तालुका भाजपातर्फे 26 जानेवारी 2019 रोजी सदर खड्ड्यांमध्ये वृक्षारोपण करण्यात येईल याची नोंद घ्यावी असे दिलेल्या निवेदनात भाजपा तालुका अध्यक्ष उमेश रेवा फेगडे,रितेश शिवाजी बारी, परेश दिलीप नाईक,योगेश विजय चौधरी, भाजप शहराध्यक्ष डॉक्टर निलेश गडे यांनी नमूद केले आहे तरी सार्वजनिक बांधकाम उपविभाग यावल मी रस्त्यावरील खड्डे बुजवणार का?याकडे यावलकरांचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *