
धुळे : 36 हाथगाड्यांवर वाहतूक शाखेची कडक कारवाई
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि). शहरातील जुना आग्रा रोड वरती वाहतुकीची समस्या भेडसावते याकरता शहर वाहतूक शाखेच्या वतीने गेल्या तीन दिवसापासून सातत्याने पाच कंदील चौक ते गांधी चौक मुख्य बाजारपेठेतील रस्त्यावर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या लोड गाडी धारकांवर ती कारवाईचा बडगा उगारला आहे यात पहिल्या दिवशी 10 लोड गाड्या शहर पोलीस वाहतूक शाखेच्या कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतल्या दुसऱ्या दिवशी 15 लोड गाड्या व आज बुधवारी दुपारच्या वेळी 11 गाड्या ताब्यात घेतल्या आहेत.
जुन्या आग्रा रोडवरील वाहतुकीची कोंडी सुटावी नागरिकांना पायी चालताना सुविधा व्हावी याकरता कारवाई करण्यात येत आहे ही कोंडी नेहमीच दिसून येते ही कोंडी फुटावी याकरता शहर पोलिस शाखेने सातत्याने कारवाई करावी.अशी अपेक्षा बाजारपेठेतील व्यवसायिकांनी व्यक्त केली आहे.
शहर वाहतूक पोलीस निरीक्षक रामकुमार उपासे यांनी शहरात जुन्या आग्रारोडवर वाहतुकीस अडथळा ठरणाऱ्या लोड गाडी धारकांवरती तीन दिवसांपासून आतापर्यंत सातत्याने कारवाई करुन 36 लोड गाड्या ताब्यात घेण्यात आल्या आहेत.सदर लोडगाडी धारक,मालक यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.तेथूनच यांचेवर दंडात्मक कारवाई करण्यात येईल अशी माहिती पोलिस निरीक्षक रामकुमार उपासे यांनी दिली.
सदर कारवाई हि जिल्हा पोलीस अधीक्षक चिन्मय पंडित व अप्पर पोलीस अधिकारी डॉक्टर राजू भुजबळ यांच्या मार्गदर्शनाने शहर वाहतूक पोलीस निरीक्षक राजकुमार उपासे हे.कॉ.ज्ञानेश्वर पाटील, नंदकुमार विसपुते, किरण म्हेरुणकर, जितेंद्र आखाडे,प्रवीण नागरे, दिनेश देवरे, मोनाली सैंदाणे, हारून शेख, श्याम काळे, दिनेश देवरे आदींनी केली आहे.