ट्रॅक्टर वर आदळली एम्बूलेन्स, तीन ठार

Featured नाशिक
Share This:

नाशिक (तेज समाचार प्रतिनिधि). सोमवारी रात्री नऊच्या सुमारास मुंबई-आग्रा महामार्गावर शिरवाडे फाट्याजवळ दृतगतिने धवात असलेली रुग्णवाहिका समोरून येत असलेल्या ट्रॅक्टर वर आदळली. या अपघातात तीन जण ठार झाले आणि एक जण जखमी झाला. हा अपघात हॉटेल गोदावरी समोर झाल्याचे कळले आहे.

अधिक महीती अशी कि, पाचोरा (जिल्हा जळगाव) येथून रुग्ण घेऊन मारुती व्हॅन (एमएच 03 एएच 4677) नाशिककडे निघाली होती. शिरवाडे फाट्यावर ट्रॅक्टर (एमएच 41 जी 4589) आणि रुग्णवाहिका यांच्यात समोरासमोर धडक झाली. या अपघातात रुग्णवाहिकेचा चक्काचूर झाला. यात रुग्णवाहिकेतील अजिजा बी. मोईद्दिन बागवान (वय 60), रफिऊद्दिन मोईद्दिन बागवान (वय 55), कमरूबी मोहिनोद्दिन बागवान (60 सर्व रा. बाहेरपुरा, पाचोरा) या तिघांचा जागेवरच मृत झाला. रुग्णवाहिका चालक सागर भिकन पाटील वाहन चालक गंभीर जखमी आहे. पिंपळगाव बसवंत येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात तिघांचे शवविच्छेदन केल्यानंतर मृतदेह नाशिक येथील नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *