यावल तालुक्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांना, वाहनांना बंदी – प्रांताधिकारी थोरबोले यांचा आदेश

Featured जळगाव
Share This:

यावल तालुक्यातील निंबादेवी धरणावर पर्यटकांना, वाहनांना बंदी – प्रांताधिकारी थोरबोले यांचा आदेश.

आदेश निंबादेवी धरणाचा आहे की नागादेवी ?

पोलिस बंदोबस्त सुरु.

यावल ( सुरेश पाटील ) : कर्तव्यदक्ष आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ.अजित थोरबोले यांच्या कार्यक्षेत्रात आणि तहसीलदार जितेंद्र कूवर,प्रभारी पोलिस निरीक्षक मंगलसिंग चव्हाण यांच्या शासकीय कार्यालयापासून पंधरा ते वीस किलोमीटर अंतरावर असलेल्या तालुक्यातील चुंचाळे परिसरात निंबादेवी धरणावर दररोज पर्यटकांची हजारोच्या संख्येने मोठी यात्रा ( गर्दी )भरत असल्याने वृत्त आज प्रसिद्ध झाल्याने त्या वृत्ताची दखल घेऊन त्या ठिकाणी पर्यटक येणार नाही याबाबत आणि सर्व प्रकारच्या वाहनांना बंदीचे आदेश आज दुपारी उशिरा प्रांताधिकारी डॉ.अजित थोरबोले यांनी काढले आहेत.
प्राधिकरण तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉक्टर अजित थोरबोले यांनी काढलेल्या आदेशात नमूद

केले आहे की, कोरोना विषाणुचा (कोविड-१९) प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथरोग प्रतिबंधात्मक कायदा १८९७ दि.३१मार्च २०२०पासुन लागु करुन खंड२,३ व ४मधील तरतुदींची अंमलबजावणीसाठी अधिसुचना निर्गमित केलेली आहे.तसेच जिल्हाधिकारी जळगाव यांनी दि.२५/३/ २०२०रोजीच्या आदेशान्वये उपविभागीय दंडाधिकारी , फैजपुर यांची कोरोना विषाणुचा (कोव्हीड-१९) संसर्ग,प्रादुर्भाव रोखण्यासाठी भारतीय साथरोग प्रतिबंध अधिनियम १९८७ नुसार आणि आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ या कायद्यातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी Incident Commander म्हणुन फैजपुर उपविभागासाठी नियुक्ती केलेली आहे.कोविड-१९चा संसर्ग रोखण्यासाठी विविध उपाय योजना शासन स्तरावरुन राबविण्यात येत आहेत.परंतु माझे असे निदर्शनास आले आहे की , निंबादेवी धरण , सावखेडासीम,ता.यावल येथे रविवार भरपुर प्रमाणावर लोकांची गर्दी झालेली होती . निंबादेवी धरणावर होणाऱ्या या गर्दीमुळे कोरोना विषाणुचा संसर्ग वाढण्याची दाट शक्यता आहे. तरी निंबादेवी धरण, सावखेडासीम,ता.यावल येथे होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी निंबादेवी धरण,सावखेडासीम,ता. यावलच्या१(एक) कि.मी. अंतरातील परिघाचे क्षेत्र ( Containment Area ) परिबंधीत क्षेत्र म्हणुन घोषित करण्यात येत आहे . प्रतिबंधीत क्षेत्रात ( Containment Area ) पूर्णपणे संचारबंदी लागु राहील आणि सदर क्षेत्रात प्रवेश आणि निर्गमन करण्यास बंदी असेल , त्याचप्रमाणे निंबा देवी धरण , सावखेडासीम , ता . यावल च्या प्रतिबंधीत क्षेत्रात ( Containment Area ) मध्ये येणाऱ्या व्यक्तींवर साथरोग प्रतिबंधात्मक कायदा१८९७ नुसार कायदेशिर कारवाई करणेत यावी.तसेच सदर क्षेत्रात येणाऱ्या वाहनांवर वाहन अधिनियमाच्या तरतुदीनुसार कारवाई करणेबाबत कार्यवाही करणेत यावी.सदर क्षेत्रात जे व्यक्ती प्रवेश करतील त्यांना १४ दिवस संस्था विलगीकरण करण्यात यावे.तसेच नियुक्त पथकाने सदर क्षेत्रात प्रवेश करणान्यास मा.जिल्हाधिकारी जळगाव यांचेकडील आदेश क्र.दंडप्र-०१/कावि/ २०२०/३९६,दि.३१जुलै २०२०नुसार प्रत्येकी रक्कम रुपये ५००/-दंड घेण्यात यावा व केलेल्या दंडाबाबत या कार्यालयाकडे दररोज अहवाल सादर करणेत यावा.
या आदेशाच्या प्रती

१) तहसिलदार यावल यांना माहितीसाठी व उचित कार्यवाहीसाठी रवाना.२) वन संरक्षक,यावल पुर्व/पश्चिम यांना उचित कार्यवाहीसाठी रवाना.२)-नागादेवी धरण , सावखेडासीम,ता.यावल च्या परिसरात गर्दी होणार नाही या दृष्टीने तेथे दोन गार्डची नियुक्ती करणेत यावी.सदर गार्ड तेथे दिवसभर राहुन धरणावर कोणताही व्यक्ती जाणार नाही याची खबरदारी घेईल.३) पोलीस निरीक्षक,यावल पोलीस स्टेशन,ता.यावल यांना उचित कार्यवाहीसाठी रवाना.२/-नागादेवी धरण, सावखेडासीम,ता.यावल परिसरात होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण मिळवण्यासाठी सदर ठिकाणी स्थापित केलेनुसार तेथे दररोज दिवसातुन वेळेस गस्तीस जावे.त्याचप्रमाणे रविवारी तेथे दोन पोलीस कर्मचाऱ्यांची दिवसभरासाठी नियुक्ती करणेत यावी.४.ग्राम स्तरीय समिती सावखेडा, नायगाव,दहिगाव,मालोद , वाघझिरा,किनगाव,चुंचाळे , विरावली,ता.यावल यांना . २/-आपल्या गावातुन नागादेवी धरण,ता.यावल येथे जाणारे रस्ते बंद करण्यात यावे. तसेच सदर धरणाकडे कोणी जाणार नाही याची काळजी घेणेत यावी . तसेच त्या क्षेत्रात जाणाऱ्या व्यक्तीवर मोटार अधिनियम नुसार कारवाई करणेत यावी. याप्रकारे संबंधित सर्व व विभागास प्रांत अधिकारी यांनी आदेश दिले आहेत.

दंडाधिकारी यांच्या आदेशात निंबादेवी आहे की नागादेवी ?

आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण तथा उपविभागीय दंडाधिकारी डॉ. अजित थोरबोले यांचा दिनांक 31 ऑगस्ट 2020 सोमवार रोजी काढलेला आदेश प्रत्यक्ष बघितला असता आदेशातील मजकुरात निंबादेवी धरण याचा उल्लेख करण्यात आला आहे. तर या आदेशाच्या प्रती उचित कार्यवाही साठी संबंधितांना रवाना करताना नागादेवी धरणाचा उल्लेख केलेला स्पष्ट दिसून येत असल्याने दिलेला आदेश निंबादेवी धरणाचा आहे की नागादेवी धरणाचा आहे हा प्रश्न उपस्थित होत आहे.

Share This: