
यावल शहरात कोरोनामुळे एकूण 707 जणांना आर्थिक फटका- 3 लाख 53 हजार 500 दंड वसूल
यावल शहरात कोरोनामुळे एकूण 707 जणांना आर्थिक फटका- 3 लाख 53 हजार 500 दंड वसूल
कोरोना बाधित एकूण 33 , मयत एकूण 5, कॉरनटाईन 21 , 7 जणांचे निगेटिव्ह रिपोर्ट
यावल (तेज़ समाचार प्रतिनिधि ): कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून नागरिकांनी माक्स लावल्याशिवाय घराबाहेर फिरू नये म्हणून जिल्हाधिकारी जळगाव यांनी सक्त आदेश काढले होते आणि आहेत, त्यानुसार गेल्या एक महिन्याच्या कालावधीत यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी स्वता: व आपले पोलीस पथकामार्फत यावल शहरात बेधडक मोहीम राबवून माक्स लावणाऱ्या एकूण 707 जणांकडून प्रत्येकी 500 रुपये प्रमाणे एकूण 3 लाख 53 हजार 500 रुपयाचा आर्थिक दंड वसूल केला आहे ही जळगाव जिल्ह्यातील सर्वात मोठी कारवाई असल्याने यावल पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.
यावल शहर व परिसरात कोरोना विषाणूची बाधा होऊ नये म्हणून यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी मोठ्या प्रमाणात जनजागृती करून वेळेप्रसंगी कटू निर्णय सुद्धा घेतले आहेत त्याचे महत्त्व आता नागरिकांच्या लक्षात आले असले तरी आता वेळ निघून गेलेली आहे अशा या गंभीर परिस्थितीत यावल शहरात कोरोना बाधित आतापर्यंत एकूण 33 रुग्ण आढळून आले त्यापैकी आतापर्यंत एकूण 5 जणांचा मृत्यू झालेला आहे ते 30 पैकी 21 टाईम आहेत त्यापैकी सात जणांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत ज्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आलेले आहेत ते स्त्री-पुरुष यावल शहरात आपल्या घरी आलेले असून 21 जणांवर उपचार सुरू आहेत.