FASTag च्या माध्यमातून डिसेंबरमध्येच 200 कोटींची टोलवसुली

Featured देश
Share This:

नवी दिल्ली  (तेज समाचार डेस्क):  : डिसेंबर 2020 मध्ये फास्टॅग (FASTag) मार्फत टोलवसुली 2,303.79 कोटी रुपये झाली. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मंगळवारी सांगितले की, मागील महिन्याच्या तुलनेत टोलवसुलीत 201 कोटी रुपये जास्त जमा झालेत. त्याचप्रमाणे फास्टॅगच्या माध्यमातून टोल व्यवहारात 1.35 कोटींची वाढ झाली.

सरकारने 1 जानेवारी 2021 पासून फास्टॅगचा वापर अनिवार्य केला होता. लोकांना असुविधेपासून वाचवण्यासाठी राष्ट्रीय महामार्गांवर 15 फेब्रुवारीपर्यंत (फास्टॅगसह रोख पेमेंट) टोलशिवया वाहनांना परवानगी देण्यात आलीय. एनएचएआयने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, “फास्टॅगमार्फत टोलवसुली डिसेंबर 2020 मध्ये 201 कोटी रुपयांनी वाढून 2303.79 कोटी रुपयांवर पोहोचली. जी नोव्हेंबर 2020मध्ये 2102 कोटी रुपये होती. फास्टॅगच्या माध्यमातून मासिक आधारे डिसेंबरमध्ये 1.35 कोटींहून अधिकची देवाण-घेवाण झाली .

13.84 कोटी रुपये डिसेंबरमध्ये फास्टॅगच्या माध्यमातून जमा झालेत, जे नोव्हेंबर 2020 मधील 12.48 कोटी व्यवहारांपेक्षा 10.83 टक्क्यांनी अधिक आहेत. तसेच 2.30 कोटी फास्टॅग वापरकर्त्यांसह एकूण टोल संकलनात हे 75 टक्क्यांहून अधिक योगदान आहे. ई-टोलचे लक्ष्य साध्य करण्यासाठी15 फेब्रुवारी, 2021 पर्यंत सर्व टोल पेमेंट फास्टॅगमार्फत केले जाणार असल्याचे निवेदनात म्हटले आहे .

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *