आसरा फाट्यावर अपघात ऑटो पलटी झाल्याने 3 जन गंभीर तर 2 जखमी- ठेकेदारावर कारवाई ची मागणी

महाराष्ट्र
Share This:

आसरा फाट्यावर अपघात ऑटो पलटी झाल्याने 3 जन गंभीर तर 2 जखमी- ठेकेदारावर कारवाई ची मागणी

मूर्तीजापुर (तेज समाचार प्रतिनिधि ):मूर्तीजापुर तालुका प्रतिनिधी फोटो  संध्याकाळी आपल्या घरी जात असताना रस्त्यात आडवा हिरण आल्यानेआसरा फाट्यावर अपघात मध्ये  ऑटो पलटी झाल्याने  तीन जन गंभीर तर दोन जखमी झाल्याची घटना दिनांक 25 फेब्रुवारी रोजी संध्याकाळी सातच्या दरम्यान घडली माहितीनुसार आसरा फाट्यावर रस्त्याच्या  दुरुस्तीसाठी  जवळपास  35 ते 30 गावकऱ्यांनी एल्गार आंदोलन पुकारले आहे पण ज्या ठेकेदारांनी काही दिवसापूर्वी रस्त्याचे काम केले ते अत्यंत निकृष्ट दर्जाचं साहित्य वापरून केलेले ठेकेदारा मुळे अपघात घडल्याचा दिसून आले त्याला कारणीभूत ठेकेदार आहे असे ग्रामस्थांचा आरोप आहे ऑटोचालक चालवताना अचानकपणे त्यांच्यासमोर हीरण आला  त्याला वाचवण्यासाठी जोराने ब्रेक मारले तर ऑटो खड्ड्यात जाऊन पडल्याने पलटी झाला अपघातात अनिल सुधाकर काळे राहणार सोनोरी प्रविण कैलास सरदार राहणार बपोरी रोशनी ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर काळे माधव नाईक शरद  खंडारे कांचन कैलास शिंदे जखमी झाले सर्वांना तातडीने मुर्तीजापुर उपजिल्हा रुग्णालय येथे उपचारासाठी आणण्यात आले राष्ट्रवादी काँग्रेसचे नेता रवी राठी भाजपाचे डॉक्टर सेलचे जिल्हाध्यक्ष अमित कावरे यांनी धाव घेतली यामधील गंभीर जखमी असलेले रोशनी काळे माधव नाईक शरद  खंडारे त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याने यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले पुढील तपास पोलीस करत आहे जखमींना त्वरित आर्थिक  मदत करावी मागील अनेक महिन्यापासून आसरा रस्त्याची दुर्दशा अत्यंत दयनीय झाली आहे या रस्त्यावर चालणे सुद्धा कठीण झाले आहे शासनदरबारी अनेकदा या संदर्भात पाठपुरावा केला परंतु संबंधित विभागाने याकडे दुर्लक्ष केले जे घटनांमुळे अपघात झाला या अपघाताला कारणीभूत असलेले संबंधित ठेकेदार व सार्वजनिक बांधकाम विभागाने गंभीर जखमी असलेले लोकांना त्वरित आर्थिक मदत करावी आणि आसरा रस्त्याचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा शिवसेना स्टाईल आंदोलन करतील अप्पु  तिडके शिवसैनिक व जिल्हा परिषद सदस्य   मूर्तीजापुर
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *