योगी आदित्यनाथ याचे निवासस्थान उडवण्याची धमकी
लखनौ (तेज समाचार डेस्क) : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचे निवासस्थान बॉम्बने उडवण्याची धमकी मिळाली आहे. ही धमकी कॉल सेंटरवरून पोलिसांच्या ११२ या कंट्रोल रूमला देण्यात आली आहे. मुख्यमंत्री निवास परिसरातील सुरक्षाव्यवस्था वाढवण्यात आली आहे.
शुक्रवारी देण्यात आलेल्या या धमकीत मुख्यमंत्र्यांच्या निवासासह राज्यातील अनेक ठिकाणे बाम्बने उडवून देऊ, असेही म्हटले आहे. मुख्यमंत्री निवास परिसर आणि त्या भागातील इमारतींचीही श्वान पथकाकडून तपासणी करण्यात आली आहे व राज्यातील महत्त्वाच्या ठिकाणी सतर्कतेचा सूचना देण्यात आल्या आहेत.
या संदर्भात उल्लेखनीय आहे की, काही दिवसांपूर्वी योगी आदित्यनाथ यांची हत्त्या करण्याची धमकी मिळाली होती. चौकशीनंतर या प्रकरणी मुंबई एटीएस पोलीसांनी धमकी देणारा आरोपी कामरान अमीन खान (२५) याला चुनाभट्टीच्या म्हाडा कॉलोनी परिसरातून अटक केली होती.