देवपूरात फळ,भाजी दुकानाला आग हजारो रुपयांचे नुकसान जिवीतहानी टळली

Featured धुळे
Share This:
देवपूरात फळ,भाजी दुकानाला आग हजारो रुपयांचे नुकसान.जिवीतहानी टळली
धुळे (तेज समाचार प्रतिनिधि ):  शहरातील देवपूर परिसरातील नवरंग पाण्याच्या टाकी समोरील रस्त्यावर मोकळ्या जागेत थाटलेल्या फळ,भाजी दुकानाला आज शनिवारी पहाटेच्या वेळी अचानकपणे आग लागली.हजारो रुपयांचे नुकसान झाले.
आग लागल्याचे लक्षात येताच परिसरातील नागरीकांनी आरडाओरड केली.रस्त्यावर गर्दी जमा झाली.दुकानाला आग कशी लागली याचे नेमके कारण कळू शकले नाही.लाकडी काठ्या व त्यावर टाकलेल्या प्लास्टिक कागदाने मोठ्या प्रमाणात पेट घेतला यात हजारो रुपयांचे नुकसान झाले आहे.सुदैवाने यात जिवीतहानी झाली नाही.
आगी बाबत मनपा अग्निशामक कार्यालयात माहिती देण्यात आली.लॉक डाऊन मुळे शहरातील रस्त्यांवर पोलीस दलाच्या वतीने बेरीकेटींग करण्यात आले आहे.हे अडथळे अग्निशामक गाडीला पार करतेवेळी बऱ्याचदा अडचणी येतात यावर मात करत चालकाने काही मिनिटांतच घटनास्थळ गाठले अग्निशामक दलाचे लिड फायरमन अमोल सोनवणे व सहकारीच्या मदतीने आगीवर पाणी करून दहा ते पंधरा मिनिटांत आगीवर नियंत्रण मिळविले.
आगी बाबत देवपूर पोलिस ठाण्यात उशीरा पर्यंत अग्नि उपद्रव 3 व 7 प्रमाणे गुन्हा नोंद करण्याचे काम सुरू होते.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *