शिरपुर शहरातील हे परिसर सील, 30 मे पर्यन्त सर्व व्यवहार बंद

Featured धुळे
Share This:

शिरपूर (तेज़ समाचार डेस्क ) : शिरपूर वरवाडे नगरपरिषद क्षेत्रातील सर्व नागरिकांना कळविण्यात येते की, शिरपूर शहरात कोरोनाचे रूग्ण आढळले आहेत. त्यामुळे भूपेश नगर, काझी नगर, अंबिकानगर, खालचे गाव बालाजी मंदीराजवळ, दारू मोहल्ला, मारवाडी गल्ली हे भाग सील करण्यात आले आहेत. येथील नागरीकांनी घराबाहेर पडू नये. या भागातील सर्व व्यवहार दि. २६ मे ते ३० मे २०२० पर्यंत बंद राहतील. आवश्यकता भासल्यास कालावधी वाढविण्यात येऊ शकतो. या भागात जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणेसाठी न.प.कडून प्रभाग अधिकारी नियुक्त करण्यात आले आहेत, त्यांच्याशी संपर्क साधावा.(संपर्क क्रमांक नागरीकांना घरपोच देण्यात येतील.)

शहरातील इतर भागात केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या काळात चालू राहतील.

नागरीकांनी विनाकारण घराबाहेर पडणे टाळावे.  आपल्या कुटुंबाची काळजी घ्या. शहरातील कोरोनाचा फैलाव टाळण्यासाठी प्रशासनाला सहकार्य करा. सर्वेक्षण पथकांना खरी माहिती सांगा. लक्षणे आढळल्यास त्वरीत काॅटेज हाॅस्पिटल, शिरपूर येथे संपर्क साधावा.

उपविभागीय अधिकारी, शिरपूर
तहसीलदार, शिरपूर
पोलीस निरीक्षक, शिरपूर
मुख्याधिकारी, शिरपूर वरवाडे नगरपरिषद.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *