
शहर बस स्थानक आवारातून व देवपूर जी टी पी स्टॉप जवळून धूम स्टाईलने चोरट्यांनी मोबाईल लंपास केला
शहर बस स्थानक आवारातून व देवपूर जी टी पी स्टॉप जवळून धूम स्टाईलने चोरट्यांनी मोबाईल लंपास केला
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधि): देवपुरात मोबाईल चोरटे पुन्हा सक्रिय नोकरदार कर्मचाऱ्यांचा मोबाईल हिसकावून दोन चोरटे धुम स्टाइल पसार.
मिळालेल्या माहितीनुसार देवपुरातील मुंबई-आग्रा महामार्गावरील जी टी पी स्टॉप जवळ ओसवाल नगरात राहणारे राजेश विष्णू सोनवणे सरकारी नोकरदार सायंकाळी जी टी पी स्टॉप बसची वाट पाहत उभे होते मोबाईलने बोलत असताना काळ्या रंगाच्या दुचाकीवर दोन अज्ञात चोरटे सोनवणे यांच्या पाठीमागील बाजूने आले व कानाला लावलेला मोबाईल दुचाकीवर बसलेल्या पाठीमागील तरुणाने हिसकावून दोघांनी घटनास्थळावरून पोबारा केला. सोनवणे आणि आरडाओरडा केला परंतु चोरटे मोटर सायकल वर असल्याने कोणीच मदतीला धावून आले नाही. चोरटे धूम स्टाईलने नगावबारी चौफुली कडे पसार झाले. यानंतर राजेश सोनवणे ह्यांनी देवपूर पोलिस ठाणे गाठत दोन अज्ञात चोरट्यांनी काळ्या रंगाच्या दुचाकीवरुन येऊन महागडा मोबाईल किंमत 6000 व सीमा कार्ड हिसकवून नेल्या प्रकरणी लेखी तक्रार दाखल केली.त्यानुसार देवपूर पोलिस ठाण्यात अज्ञात दोन चोरट्यांन विरुद्ध मोबाईल हिसकावून नेल्या प्रकरणी देवपूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आलेला आहे.
शहर बसस्थानक आवारात हि चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच आहे. काल दुपारच्या वेळी वरती धूम स्टाईलने चोरट्यांनी एका प्रवासी चा दहा हजार रुपये किमतीचा मोबाईल लंपास केला.बस स्थानकातील सीसीटीव्ही फक्त शोभेचे आहे अशी चर्चा नागरिक करत आहेत. या प्रकरणी शेख आवेश शेख जाकीर यांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध लेखी तक्रार शहर पोलीस ठाण्यात दाखल केली शहर पोलीस पुढील तपास करीत आहेत. पुढील तपास पोसई एल एन पवार करीत आहे.