म्हणून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केलं नाशिकमधील शेतकऱ्याचं कौतुक!

मुंबई
Share This:

 

नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदींनी Unlock 1.0 सुरू होण्याआधी रविवारी मन की बात कार्यक्रमाद्वारे नाशिकमधील एका शेतकऱ्याचं कौतुक केलं. नाशिकच्या सतना गावातील शेतकरी राजेंद्र यादव यांनी आपल्या गावात कोरोनाचं संक्रमण रोखण्यासाठी अनोखी मोहिम राबल्याचं त्यांनी सांगितलं.

नाशिकचे राजेंद्र यादव यांचं उदाहरण खूप रंजक आहे. राजेंद्र हे नाशिकमधील सतना गावचे शेतकरी आहेत. आपल्या गावाला कोरोना संसर्गापासून वाचवण्यासाठी, राजेंद्र यादव यांनी आपल्या ट्रॅक्टरला जोडून एक सॅनिटायझर मशीन तयार केली आहे. हे अत्यंत इनोव्हेटीव्ह मशीन असून खूप कुशलपणे ते आपलं कार्य करत आहे, त्यामुळे कोरोना संसर्ग होण्याचं प्रमाण कमी झालं आहे, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले.

कोरोनामुळे भारतात लॉकडाऊन असल्याने भारताच्या अर्थव्यवस्थेचं चाक रुतल्याचं चित्र आहे. त्यामुळे आता देश अनलॉक करण्यास केंद्र सरकारनं सुरुवात केली आहे.

1 जूनपासून यासंदर्भात टप्प्याटप्प्याने कार्यवाही करण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर नागरिकांनी सतर्क आणि सावध राहणं महत्त्वाचं आहे. नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं पालन करावं तसेच केंद्र सरकारकडून वेळोवेळी देण्यात आलेल्या सूचनांचं पालन करावं ,असं आवाहन करण्यात आलं आहे.

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *