
तरुणांनी केलेल्या प्रकारानं एसटी महामंडळाची झोप उडाली!
लातूर (तेज समाचार डेस्क): लातूर जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातल्या औराद बस स्थानकातून एक धक्कादायक प्रकार समोर आला अहे. दारुच्या नशेत काही तरूणांनी चक्क एसटीच पळवून नेल्याचं कृत्य केलं आहे.
शेळगी गावातल्या काही तरुणांनी रात्री उशिरा गावात जाण्यासाठी एसटी नसल्यानं त्यांनी चक्क बस स्थानकातून एसटीच पळवून नेली आहे.
एसटी पळवत असताना विजेच्या दोन खांबाना धडक लागल्यानं विजेच्या तारा तुटून खाली पडल्या आणि विजेचे खांब देखील कोसळले आहेत.
दरम्यान, बस स्थानकात झोपलेल्या वाहक आणि चालकाला जाग आली तेव्हा एसटी जागेवर नसल्याचं समजताच त्यांनी औराद पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी शोध घेतल्यानंतर शेळगी गावात एसटी सापडली. या घटनेत एसटीचं 25 हजार रुपयांचं नुकसान झालं आहे.