यावल नगरपरिषद हद्दीत अनेकांचा मृत्यू परंतु नोंदी नाहीत
यावल नगरपरिषद हद्दीत अनेकांचा मृत्यू परंतु नोंदी नाहीत.
अनेकांच्या उपस्थितीत अंत्यविधी तात्काळ आटोपला जात आहे.
महसूल व आरोग्य विभागाचे अक्षम्य दुर्लक्ष.
जिल्हाधिकारी जळगाव यांनी तात्काळ कारवाई करणेची मागणी.
यावल (तेज समाचार प्रतिनिधि): संपूर्ण जगात भारत देशात, महाराष्ट्रात, जिल्ह्यात कोरोना विषाणूच्या बाधेमुळे संपूर्ण शासकीय-निमशासकीय, राजकीय, सामाजिक यंत्रणा प्रभावित झालेली आहे अशा गंभीर परिस्थितीत यावल नगरपरिषद हद्दीत गेल्या महिनाभरात विविध जाती धर्मातील अनेक स्त्री-पुरुष यांचे निधन झाले आहे, परंतु यावल नगरपरिषद कार्यालयात मृत्यू बाबत नोंदी करण्यात आलेल्या नसल्याची माहिती मिळाली आहे, मयत झालेल्या काही व्यक्तींचा अंत्यविधी अनेकांच्या उपस्थित तात्काळ का करण्यात येतो ? हा महत्वाचा प्रश्न सुद्धा उपस्थित केला जात आहे अंत्यविधीतील मोठी गर्दी यावल शहरातील अनेक ठिकाणी लावलेल्या सी.सी.टी.व्ही. कॅमेरा सुद्धा बंद होत आहेत परंतु कारवाई शून्य असल्याने नागरिकांमध्ये अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
यावल नगरपरिषद कार्यालयात मृत्यू झालेल्या स्त्री-पुरुषांची नोंद करणाऱ्या संबंधित कर्मचाऱ्यास भ्रमणध्वनीवरून विचारणा करून माहिती घेण्याचा प्रयत्न केला असता शहरात विषाणूच्या संदर्भात इतर कामाचा व्याप जास्त वाढला असल्याने गेल्या महिन्याभरापासून नगर परिषदेत मृत्यूच्या नोंदणी झालेल्या नाहीत अशी माहिती मिळाली.
परंतु यावल शहरात गेल्या महिनाभरात काही ठराविक स्त्री-पुरुषांचा मृत्यू झाला असता त्यांचा अंत्यविधी त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ दोन तासाच्या आत आटोपल्याने हे काही स्त्री-पुरुष बाधित होते का ? आणि ते मयत कोरोना बाधित असताना मयत झाले असतील तर त्यांच्या संपर्कात कोण कोण आणि किती लोक संपर्कात आले असतील ? आणि काही ठिकाणच्या अंत्ययात्रेत जिल्हाधिकार्यांचा आदेश धाब्यावर ठेवून मोठी गर्दी झाली होती आणि ती काही ठिकाणच्या सीसीटीव्ही कॅमेरात सुद्धा बंद झालेली आहे परंतु गर्दी करणाऱ्यांवर कारवाई झालेली नाही याबाबत शहरात अनेक प्रश्न उपस्थित केले जात असून यावल शहरात कोणत्याही स्त्री-पुरुषाचा मृत्यू झाल्यास त्याचा मृत्यू वृद्धापकाळाने, आजाराने, हृदयविकाराने किंवा कोरोना बाधेमुळे झाला आहे किंवा नाही ? याची चौकशी संबंधितांनी तात्काळ केल्यास यावल शहरातील वस्तुस्थिती लक्षात येईल नाहीतर महिना-दोन महिन्यानंतर त्या काहीचा मृत्यू झाल्यांची मृत्यूची नोंद करताना संबंधित खरी माहिती लपवून मृत्यूची नोंद करून शासनाची दिशाभूल आणि फसवणूक करतील असे सुद्धा उघडपणे यावल शहरात बोलले जात आहे.
अशा गंभीर परिस्थितीत शहरात मृत्यू होणाऱ्याची नोंद वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या, फॅमिली डॉक्टरच्या किंवा त्या प्रभागातील नगरसेवकाने पूर्ण खात्री केलेल्या लेखी पत्राने तात्काळ केल्यास मयत व्यक्ती कोणत्या आजाराने किंवा कारणाने मृत्यू झाला हे सर्वांच्या लक्षात येईल असे यावल शहरात बोलले जात आहे.