तरूणाने गळा दाबून केली मैत्रिणीची हत्या

देश मुंबई
Share This:

गुंटूर (तेज समाचार डेस्क): आंध्रप्रदेशातील गुंटूरमध्ये पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या अनुषा नावाच्या मुलीची तिच्याच मित्राने हत्या केल्याची घटना समोर आली आहे. अनुषा नरासरावपेट इथल्या कृष्णदेवी पदवी या महाविद्यालयाची विद्यार्थीनी होती. अनुषानं तिच्या वर्गातील एका मुलासोबत मैत्री केली. तिचा मित्र विष्णूवर्धन याला ही मैत्री आवडली नाही. विष्णूवर्धनने अनुषाला अज्ञात स्थळी बोलवलं. यावेळी या दोघांमध्ये मोठा वाद झाला. त्यानंतर विष्णूवर्धननं अनुषाची गळा दाबून हत्या केली आहे. मैत्रिणीचा मृत्यु झाल्याचं कळताचं त्यानं तिचा मृतदेह पालापाडा येथील एका कालव्यात टाकून दिला. त्यानंतर त्याने स्वतःला पोलिसांच्या स्वाधिन केलं.

पोलिसांनी या प्रकरणी विष्णूवर्धनवर हत्येचा गुन्हा दाखल केला आहे. यासंबंधी पोलिस अधिक तपास करत आहेत. अनुषाच्या कुटुंबांनी आणि मित्र परिवाराने मोठ्या संख्येने एकत्र येत आरोपी विरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री वाय.एस. जगन मोहन रेड्डी अनुषाच्या कुटुंबाला 10 लाख रूपयांची मदत जाहीर केली आहे. त्याच बरोबर आरोपीवर कठोर कारवाई करणार असल्याचं देखील आश्वासन देखील मुख्यमंत्र्यांनी दिलं आहे

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *