एरंडोलहून भरूच जाणार्‍या महिलेला रात्रीच्या वेळी उतरविले निर्ज्जनस्थळी

Featured जळगाव
Share This:

खाजगी ट्रव्हल्स चालकांची मनमानी, आरटीओकडून कारवाईचे संकेत

जळगाव ( केदारनाथ सोमानी कासौदा ) : भरुचला जाण्यासाठी एरंडोलहून बसलेल्या तरुण विवाहित महिलेला भरुचला न उतरवता ४७ कि.मी.पुढे पहाटेच्या अंधारात एकटीला निर्ज्जनस्थळी उतरवून दिले होते. याबाबत घटनेची तक्रार केल्यानंतर जळगाव आरटीओंनी दखल घेत गाडीचा व संबंधित ड्रायव्हरचा परवाना रद्द का? करण्यात येऊ नये म्हणून कारवाई करण्याचे संकेत दिले आहेत.

यासंदर्भात प्रमोद पाटील रा. कासोदा ता.एरंडोल यांनी आरटीओ अकोला व अहमदाबाद यांचेकडे तक्रार केली आहे की, माझी मुलगी शलाका पाटील या नावाने जय मेलादी जय मेल्डीबस क्रमांक जी.जे.०१ डी.झेड. ८३२२ या गाडीसाठी रेडबस द्वारा आँनलाईन १० मार्च रोजी बुकिंग भरुच गुजरातसाठी केले होते. ११ रोजी रात्री एरंडोल येथून तिला मी स्वतः तिच्या आसन क्रमांक ’जी’ वर बसविले. चालक व त्याच्या सोबतच्या कर्मचार्‍यांला भरुचचे तिकीट आहे.

भरुचला उतरवून द्या, असे आवर्जून सांगितले. परंतू ही बस भरुच येथे न थांबवता या चालकाने भरुचहून ४७ कि.मी. पुढे पहाटेच्या अंधारात ५ वाजेला एकट्या महिलेला निर्जनस्थळी उतरवून दिले. मुलीने विनवणी केली की, येथे कुणीच नाही,अशा रस्त्यावर का उतरवतात,तर त्यांनी उद्दामपणे उत्तर दिले की, जो करना है करो, कम्प्लेंट करो हमारा कुछ नही होता. माझ्या मुलीने तिच्या पतीशी भ्रमणध्वनीद्वारे संपर्क केला, ते खाजगी ऑटो घेऊन आले. सकाळी ७ वाजेला घरी पोहचले आहेत. महिलांवर होणारे अत्याचार, निर्भया सारख्या घटना अशा बेजबाबदार वृत्तीमुळेच घडतात. अशा घटना या खाजगी बसकडून घडू नयेत, घटना घडल्यानंतर कारवाई होणारच पण अशा घटना घडूच नयेत, महिला सुरक्षित राहाव्यात म्हणून त्यांच्यावर कारवाई होण्याची गरज असल्याचे त्यांनी तक्ररीत म्हटले आहे

जळगाव आरटीओकडून बस जमा
या घटनेनंतर मुलीचे पालक प्रमोद पाटील यांनी संबंधित सर्वांना मेलद्वारे तक्रार केली. जळगाव येथील आरटीओनीं याप्रकरणी गंभीर दखल घेऊन संबंधित बस जमा केली आहे. या गाडीचा परवाना व चालकाचे लायसन्स रद्द का करु नये अशी नोटीस बजावली आहे. अशा बेजबाबदार लोकांमुळे अघटित घटना घडतात, यासाठी अशा प्रकरणात अजून शक्य ती कठोर कारवाई करण्यात येईल अशी माहिती दिली आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *