अपघातात बळी घेतलेल्या वाहनाचा व आरोपीचा अद्याप तपास नाही

Featured जळगाव
Share This:

अपघातात बळी घेतलेल्या वाहनाचा व आरोपीचा अद्याप तपास नाही

चार महिने उलटल्याने आरपीआय कडून प्रशासनाला निवेदन आणि जेलभरो आंदोलनाचा इशारा.

यावल ( सुरेश पाटील): जुन महिन्यात यावल – भुसावळ रस्त्यावर रात्री एका अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकी वरील दोन दलीत तरूण ठार झाले होते. तेव्हा या गुन्ह्यात यावल पोलिसांनी अद्याप अज्ञात वाहनाचा शोध घेतला नाही व दोषींचा शोध घेतला नाही म्हणुन मंगळवारी येथील तहसिल कार्यालया समोर रिपाईच्या आठवडे गटाकडून आंदोलन करण्यात आले व तहसिल कार्यालयात निवेदन देण्यात आले.
भुसावळ रस्त्यावर निमगाव शिवारात घोडेपिर बाबाच्या दर्गेसमोर दिनांक १५ जुन रोजी रात्री ८.३० ते ९ वाजेच्या सुमारास भरधाव वेगाने जाणाऱ्या एका अज्ञात मोठ्या गाडीने दुचाकी क्रमांक एम. एच. १९ डी. एल. ३०६७ या दुचाकीस जबर धडक दिली यात रोशन बबलु सोनवणे वय १७ रा. हुडको कॉलनी लोणारी मंगल कार्यालय भुसावळ व त्यांचा मावसभाऊ पुंडलिक चंद्रकांत सोनवणे वय १९ रा. यावल हे दोन दलीत मुलांचा जागीच मृत्यु झाला होता. या बाबत यावल पोलीस स्टेशनला गुन्हा नोंद असुन घटना घडल्या पासून आज पर्यंत या अपघात प्रकरणी पोलीसांनी कुठलीच कारवाई केली नाहीये व तसेच त्या मार्गावरील सी.सी. टि.व्ही. फुटेजची चौकशी केली नाही व खरे आरोपी शोधण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला नाही तसेच अपघातातील मयत रोशन सोनवणे जवळील ऍनरॉईड मोबाईलचा शोध अद्याप ही पोलियांनी घेतला नाही. एकुण हा अपघात होता का घातपात हा देखील संशय असुन रिपब्लीकन पार्टी ऑफ इंडिया तर्फे निवेदनाव्दारे व्यक्त करण्यात आला आहे तेव्हा तातळीने या प्रकरणी सखोल चौकशी करून खऱ्या आरोपीचा शोध पोलिसांनी घ्यावा अशी मागणी करण्यात आली आहे. या बाबत रिपाईचे आठवले गटाचे जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आले या प्रसंगी तालुकाध्यक्ष अरूण गजरे, शहराध्यक्ष विष्णु पारधे, भिमराव गजरे, राजु सोनवणे, विशाल गजरे, सागर गजरे, सुमीत गजरे, चंदू पारधे, अशोक बोरेकर, तुषार बेरेकर, लखन बोरेकर, मनोज बोरेकर, सिध्दार्थ बोरेकर, सुमीत निकम, विलास भास्कर, राजु सुरवाडे, बबलु गजरे, सोहन गजरे, करण अडकमोल सह बहुसंख्येत पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.तेव्हा या प्रकरणी तात्काळ चौकशी करून कारवाई केली नाही तर जेलभरो आंदोलन छेडण्यात येईल असा इशारा रिपाई जिल्हाध्यक्ष राजु सुर्यवंशी यांनी दिला आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *