सरकारी कर्मचाऱ्यांसाठी थर्मल स्क्रिनिंग व मास्क वापरणे बंधनकारक

मुंबई
Share This:

 

मुंबईः महाराष्ट्रात करोनाचा संसर्ग दिवसागणिक वाढत चालला आहे. करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता सरकारी कार्यालयांसाठी नवीन मार्गदर्शक सुचना जारी करण्यात आल्या आहेत. यामध्ये दररोज सुरक्षित वावराच्या नियमांसोबत थर्मल स्क्रिनिंग, सॅनिटायझर, मास्क वापरणे बंधनकारक आहे.

करोना व्हायरसचा सर्वाधिक फटका महाराष्ट्रात बसला आहे. महाराष्ट्रात करोनाचे ५० हजारांहून अधिक रुग्ण आहेत. यासाठीच प्रशासनानं सरकारी कर्मचाऱ्यांसाठी नवीन गाइडलाइन जारी केल्या आहेत. करोनाच्या संसर्गामुळं राज्यातील सरकारी कार्यालयात कर्मचाऱ्यांची संख्या कमी होत चालली आहे. दरम्यान, सरकारनं नव्या सुचना जारी केल्या असल्या तरी कार्यालय कधीपासून सुरू होणार याबाबत अद्याप कोणताही घोषणा करण्यात आलेली नाहीये. राज्याचे प्रधान सचिव प्रदीप व्यास यांनी नवीन गाइडलाइनची एक प्रत जाहीर केली आहे. त्यानुसार…

– कार्यालयात वावरताना मास्क असणे आवश्यक

– कार्यालयात २० सेकंदपर्यंत हॅन्डवॉश व साबणानं हात धुणे

– तोंड, नाक व डोळ्यांना हात लावू नये, जेणेकरून व्हायरसचा फैलाव रोखता येईल

– खोकताना व शिंकताना मास्क किंवा स्वच्छ रुमालाचा वापर करा

– कार्यालयात ३ फुटांचं अंतर राखा, कर्माचाऱ्यांची बैठक व्यवस्थाही त्याप्रमाणेच करता येणार

– कर्मचाऱ्यांचे शाररिक तापमान १००.४ डिग्रीपर्यंत असल्यास लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात येईल

– करोनासदृष्य लक्षण आढळल्यास १४ दिवस ऑफिसमध्ये येऊ दिले जाणार नाही

– कार्यालयातील लिफ्ट, लिफ्टचे बटण व खुर्ची दिवसातून तीन दिवस सॅनिटाइज करण्यात येणार

– एकाच गाडीतून तीनपेक्षा अधिक लोकांनी प्रवास टाळावा

– वर्क फ्रॉम होमच्या पर्यायाचा वापर अधिक करणे

– ऑफिसमधील कम्पुटर, किबोर्ड, माउस, प्रिंटर व स्कॅनर ईत्यादी उपकराणांची सफाई करावी. ७०%हून अधिक अल्कहोल असलेल्या सॅनिटायझरचा वापर करावा

– कार्यालयातील शौचालये दिवसातून तीनवेळा सोडियम हायपोक्लोराइट, डिटर्जंटनं साफ करण्यात यावे

 

 

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *