अनधिकृतपणे स्थापन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा यावल पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ हटविला

Featured जळगाव
Share This:

अनधिकृतपणे स्थापन केलेला शिवाजी महाराजांचा पुतळा यावल पोलीस निरीक्षक यांनी तात्काळ हटविला

यावल तालुक्यातील मोहराळे येथील घटना
यावल ( सुरेश पाटिल ): रात्रभरात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे स्थापन केल्याची वार्ता सकाळी संपूर्ण ग्रामस्थांमध्ये पसरता बरोबर यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना माहिती मिळता बरोबर पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी भल्यापहाटे मोहराळे गावात जाऊन अनधिकृतपणे बसविलेला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विधिवत काढून ग्रामपंचायत कार्यालयात सुरक्षित पणे ठेवल्याने मोहराळे गांवासह संपूर्ण तालुक्यात व जिल्ह्यात होणारी अप्रिय घटना टळल्याने तसेच कायदा सुव्यवस्था जातीय सलोखा कायम राहिल्याने सर्व स्तरातून यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे व ग्रामस्थांचे कौतुक करण्यात येत असले तरी श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविणारे त्या अज्ञात व्यक्ती कोण याबाबत यावल पोलीस पुढील तपास करीत आहेत.
         यावल तालुक्यातील मोहराळे गावात बस स्टॉप जवळच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यापासून शंभर ते दीडशे फूट अंतराच्या आत श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा दिनांक 12 जून 2020 शुक्रवार रोजी रात्री कोणीतरी अज्ञात व्यक्तींनी कोणतीही परवानगी न घेता आणि कोणालाही पूर्वसूचना न देता स्थापन करून टाकला होता शनिवार दिनांक 13 रोजी सूर्योदय होण्याच्या आतच श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा स्थापन करण्यात आल्याची चर्चा संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरल्याने आणि त्याचे वृत्त तात्काळ यावल पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांना समजल्याने पोलीस निरीक्षक अरुण धनवडे यांनी तात्काळ घटनास्थळ गाठून स्थापन केलेला श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा विधिवत रित्या काढून घेऊन मोहराळे ग्रामपंचायत कार्यालयात सुरक्षित रित्या ठेवला या तात्काळ समय सूचकतेमुळे आणि कर्तव्य दक्षपणा मुळे संपूर्ण ग्रामस्थांसह तालुका व जिल्ह्याची कायदा व सुव्यवस्था आणि जातीय सलोखा अबाधित राहिल्यामुळे मोराळे ग्रामस्थांसह यावल पोलीस निरीक्षक व पोलिसांचे सर्वत्र कौतुक करण्यात येत असून मोराळे गावात श्री छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा अनधिकृतपणे बसविणाऱ्या च्या अज्ञात लोकांची चौकशी यावल पोलीस करीत असल्याने संपूर्ण यावल तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे याबाबत मोहराळे पोलिस पाटील  युवराज पाटील यांच्याशी भ्रमणध्वनीवरून  आज दिनांक  16 जून 2020 रोजी संपर्क साधला असता त्यांनी या वृत्तास आणि घटनेस दुजोरा देऊन पुढील चौकशी यावल पोलीस करीत असल्याची माहिती दिली.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *