
यावल भुसावल रस्त्यावर मोठ्या खड्ड्यामुळे ट्रक पलटी झाला
यावल भुसावल रस्त्यावर मोठ्या खड्ड्यामुळे ट्रक पलटी झाला
यावल (सुरेश पाटिल): . यावल भुसावळ रस्त्यावर यावल कडून जाताना यावल ते निमगांव दरम्यान रस्त्यावर मोठे खड्डे पडलेले असल्याने एका खड्ड्यात ट्रकचे पुढील टायर गेल्यामुळे टायर फुटून ट्रक पलटी झाल्याची घटना घडली, आधीच निकृष्ट प्रतीची डाग्-डुगी केलेल्या रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडले असल्यामुळे किरकोळ अपघात दररोज सुरू आहेत, त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावळ – भुसावळ रस्त्यावरील खड्ड्यांची मजबूतपणे डांग-डुगी करावी असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.
गेल्यावर्षी विधानसभा निवडणुकीच्या आधी सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमांक 2 जळगाव तर्फे यावल – भुसावळ रस्त्यासाठी 437 लक्ष रुपये मंजूर केल्याने तत्कालीन आमदार हरिभाऊ जावळे यांनी या रस्त्याचे कामाचे भूमिपूजन सुद्धा केले होते परंतु त्यानंतर निवडणुकी निमित्त आचारसहिता लागल्याने कामाची सुरुवात झालेली नव्हती,
आणि आता कोरणा विषाणूमुळे संपूर्ण राज्यातील बांधकाम विभागाचे कामे बंद पडलेली असल्यामुळे रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याने त्या वेळेला सार्वजनिक बांधकाम विभागाकडून रस्त्याची डागडुजी करण्यात आली परंतु संबंधित ठेकेदाराने निकृष्ट प्रतीची केल्याने आता या रस्त्यावर खूप मोठे मोठे खड्डे पडलेले आहेत या रस्त्यावर दररोज विविध राज्यातील अवजड वाहनांसह यावल तालुक्यातील अनेकांची मोठी वाहतूक सुरू असते, मोठ्या प्रमाणात वाहतूक सुरू असताना दररोज मागून किंवा पुढून येणारे वाहन एकमेकांनवर आदळून अनेकांच्या वाहनांचे किरकोळ व मोठ्या स्वरूपाचे नुकसान होत असते अनेक जण या रस्त्यावर पडून फॅक्चर सुद्धा झालेले आहेत. त्यामुळे सार्वजनिक बांधकाम विभागाने यावल भुसावळ रस्त्याची उत्कृष्ट प्रतीची डाग – डुगी तात्काळ करावी अन्यथा या रस्त्यावर फार मोठी अप्रिय घटना घडल्या शिवाय राहणार नाही आणि या घटनेस सार्वजनिक बांधकाम विभाग जबाबदार राहील असे सुद्धा यावल तालुक्यात बोलले जात आहे.