
सोनगीर मोबाईल व लँड लाईन फोन सेवा काही दिवसांपासून विस्कळीत
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधी) : सोनगीर व परिसरात मोबाईल व लँड लाईन फोन सेवा गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाली आहे. परिणामी या सेवेशी संबंधित दैनंदिन व्यवहार ठप्प होत आहेत. ही सेवा सुरळीत करावी अशी मागणी ग्रामस्थ करत आहेत.
सोनगीर व परिसरात मोबाईल सेवा पुरवण्यासाठी खाजगी कंपन्यांचे पाच टॉवर आहेत .तर शासकीय नियंत्रणात असलेल्या बी.एस.एन.एल. या कंपनीचा एक टावर आहे. आयडिया, व्होडाफोन,जिओ,एअरटेल ह्या खाजगी कंपनीचे ग्राहक मोठ्या संख्येत आहेत.तर बी.एस.एन.एल.चे ग्राहक कमी असले तरी बँक व शासकीय कार्यालयांना ब्रॉडबँड व लँड लाईन सेवा या कंपनी द्वारे पुरवली जाते .मात्र गेल्या काही महिन्यांपासून सर्व कंपन्यांनी ग्राहकांना सेवा पुरवण्या कडे दुर्लक्ष केलं आहे.परिणामी परिसरात तासन तास मोबाईल नेटवर्क नसते.तर काही वेळा नेटवर्क असलं तरी फोन लागत नाही. अशा अनेक तक्रारी आहेत.ग्राहक वरिष्ठ अधिकाऱ्यांशी संपर्क साधतात तर टॉवरला विद्युत पुरवठा ठरणारी बॅटरी बॅकअप नसल्या मुळे अडचणी येत असल्याचे सांगून वेळ मारून नेली जाते.आधी ही समस्या वीज पुरवठा खंडित झाल्यावरच येत होती.मात्र गेल्या काही महिन्या पासून रोज काही न काही कारण सांगून नेटवर्क बंद असते.या मुळे बँकिंग व शासकीय कार्यालयांमध्ये मोठा परिणाम होत आहे.नेटवर्कच्या समस्ये मुळे ग्राहक त्रस्त झाले आहेत. नेटवर्क पुरवणाऱ्या सर्व कंपन्यांना एकाच वेळी येणाऱ्या प्रॉब्लेम मुळे नेमकं कोणत्या कंपनीचे नेटवर्क वापरावे हे ठरवणे देखील ग्राहकांना कठीण झाले आहे.एकी कडे रिचार्जच्या दरात मोठी वाढ झाली आहे तर दुसऱ्या बाजूला खाजगी कंपन्या ग्राहकांना सेवा देण्या कडे दुर्लक्ष करत आहेत. तरी तात्काळ ही समस्या सोडवावी अशी मागणी ग्राहकांकडून केली जात आहे.