बलात्कारी बापाचा मुलीनेच केला कुऱ्हाडीने खून

Featured महाराष्ट्र
Share This:

बलात्कारी बापाचा मुलीनेच केला कुऱ्हाडीने खून

मुंबई (तेज समाचार डेस्क): तलासरी तालुक्यामध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. येथील एका ४५ वर्षीय व्यक्तीची कुऱ्हाडीने वार करुन हत्या करण्यात आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे या व्यक्तीच्या १९ वर्षीय मुलीनेच ही हत्या केली असून वडील या मुलीवर लैंगिक अत्याचार करण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना विरोध करण्यासाठी आणि आपला जीव वाचवण्यासाठी तिने हे पाऊल उचलल्याचे सांगण्यात येत आहे. या संपूर्ण प्रकार या मुलीच्या २२ वर्षीय भावासमोर घडल्यानंतर त्याने यासंदर्भात पोलिसांना फोन करुन माहिती दिली. यासंदर्भातील वृत्त ‘हिंदुस्तान टाइम्स’ने दिलं आहे.

फोनवरुन हत्या झाल्याची माहिती मिळातच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या मुलीला अटक केली. मृत व्यक्तीविरोधातच बलात्कार आणि लैंगिक शोषण केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मृत व्यक्तीच्या पहिल्या पत्नीपासून त्याला २२ वर्षांचा मुलगा होता. दुसऱ्या पत्नीबरोबर लग्न झाल्यानंतर मुलीचा जन्म झाला होता. “माझे वडील २०११-१२ पासून सातत्याने माझ्यावर लैंगिक अत्याचार आणि बलात्कार करायचे. मी घरी एकटीच असताना ते हे कृत्य करायचे, अशी माहिती या मुलीने पोलिसांनी असून याचमुळे ही मुलगी डहाणूमध्ये तिच्या आईसोबत रहायची. आठवड्यातून एखाद्या दिवशी ती आपल्या वडिलांना भेटायला यायची,” अशी माहिती तलासरी पोलीस ठाण्यातील वरिष्ठ निरीक्षक अजय वसावी यांनी दिली.

“जेव्हा ही मुलगी घरी यायची तेव्हा तिचे वडील तिच्यावर बलात्कार करण्याचा प्रयत्न करायचे. ३१ मे रोजी रात्री दोन वाजता हा इसम आपल्या मुलीच्या रुममध्ये गेला आणि त्याने तिचे लैंगिक शोषण करण्याचा प्रयत्न केला. संतपालेल्या या मुलीने स्वयंपाकघरातील कुऱ्हाडीने वडीलांच्या डोक्यावर, मानेवर, हातावर वार केले. यामध्ये या व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला,” असं वसावी यांनी सांगितलं. दुसऱ्या रुममध्ये झोपलेल्या २२ वर्षीय मुलाला जाग आली तेव्हा समोर सुरु असणारा सर्व प्रकार पाहिला. मात्र तोपर्यंत खूप उशीर झाला होता. नंतर या मुलानेच पोलिसांना फोन करुन घडलेल्या घटनेची माहिती दिली.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *