यावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली

Featured जळगाव
Share This:

यावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली.

यावल नगरपरिषद प्रशासनाला मोठी चपराक.

यावल (सुरेश पाटील): यावल नगरपरिषद घनकचरा कामाचा प्रस्ताव सहाय्यक आयुक्तांकडून निकाली काढल्याने यावल नगरपरिषद प्रशासनाला मोठी चपराक बसली आहे. याबाबत जिल्हाधिकारी कार्यालय जळगाव नगरपालिका शाखा सहाय्यक आयुक्त सतीश दिघे यांनी बुधवार दिनांक 1/9/2021 रोजी यावल नगर परिषद मुख्याधिकारी यांना दिलेल्या लेखी पत्रात नमूद केले आहे की,यावल नगरपालिकेतर्फे घनकचरा व्यवस्थापनाअंतर्गत यावल शहरातील गाळ,कचरा, डेब्रिज वाहतूक व द्वार ते द्वार कचरा संकलन,ओला व सुका कचरा वर्गीकरण करून संकलन करणे व त्याची वाहतूक नगरपरिषदेच्या कंपोस्ट खत प्रकल्पावर करणेच्या कामास एक वर्षाच्या कालावधीसाठी म्हणजे दिनांक11/8/2020ते दिनांक 19/8/2021 प्रयन्त प्रशासकीय मान्यता दिली होती सदर प्रशासकीय मान्यतेची मुदत दिनांक19/8/2021रोजी संपणार असल्याने यावल नगरपरिषदेने चाळीसगाव येथील मक्तेदार आर.एम.भालेराव यांना पुढील6महिन्यांच्या कालावधीसाठी मुदतवाढ देणे बाबतचा प्रस्ताव प्रशासकीय मान्यतेस्तव सादर केला आहे.
तरी यावल नगरपालिकेस कळविण्यात आले आहे की या कार्यालयाच्या आदेशान्वये एक वर्षासाठी देण्यात आलेली घनकचरा व्यवस्थापन कामाची मुदत दिनांक19/8/2021 रोजी संपणार असल्याने आपण पुढील कालावधीसाठी नवीन निविदा प्रक्रिया पार पाडणे आवश्यक होते.परंतु आपण नवीन निविदा प्रक्रिया न करता जुन्या मक्तेदारास पुढील6महिन्यांच्या कालावधीसाठी सदर काम करण्यास मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव मान्यतेस्तव सादर केला आहे.तथापि जिल्हाधिकारी यांनी घनकचरा व्यवस्थापन ही संबंधित कामाबाबत मुदत संपणाऱ्या निविदा यांच्या अनुषंगाने नवीन निविदा प्रक्रिया न करणाऱ्या नगरपरिषदा नगरपंचायती यांचे जुन्याच मतदारांना काम करण्यासाठीच्या प्रस्तावास मुदतवाढ/प्रशासकीय मान्यता न देणेबाबत सूचित केले आहे.सबब आपला प्रस्ताव निकाली काढण्यात येत आहे तरी सदर कामासाठी आपण त्वरित नवीन निविदा प्रक्रियेचा अवलंब करून प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव इकडील कार्यालयास सादर करावा असे दिलेल्या लेखी पत्रात सहाय्यक आयुक्त सतीश दिघे यांनी नमूद केले आहे.

यावल नगर पालिका प्रशासनास मोठी चपराक-
यावल नगरपरिषदेतील दि.3/8/2021रोजी सर्वसाधारण सभेतील ठराव क्र.1076 प्रत्यक्ष बघितला असता विषय क्र.11 सन 2021/22या वित्तीय वर्षामध्ये घनकचरा व्यवस्थापन अंतर्गत कचरा संकलन करणे बाबत विचार विनिमय करण्यात आला तसेच चाळीसगाव येथील आर.एम.भालेराव(यावल नगर परिषदेचे तत्कालीन मुख्याधिकारी बबन तडवी रहात असलेल्या शहरातील मक्तेदार असलेल्या)यांना सन2020/21 च्या करारनामा व कार्यादेशानुसार व तत्कालीन मंजूर दरानुसारच नवीन निविदा प्रक्रिया कार्यवाही कार्यादेश होईपर्यंत सदर कामास 14वा वित्त आयोग15वा वित्त आयोग निधी अंतर्गत मुदतवाढ देण्यात येत आहे व जिल्हाधिकारी यांच्याकडून प्रशासकीय मान्यता घेऊन मक्तेदारास मुदत वाढ देण्यात यावी तसेच निविदा प्रक्रिया राबवितांना सदर घन कचरा संकलन व अनुषंगिक कामे करणे हे14वा वित्त आयोग/15 वा वित्त आयोग निधी अंतर्गत नुसार करण्यात यावे तसेच सदर काम वार्षिक करणे व काम समाधानकारक असल्यास अधिक उत्तम तीन वर्षापर्यंत मक्तेदाराकडून काम करण्यास ही सभा मंजुरी प्रदान करीत आहे. असा ठराव करण्यात आला होता.
या ठरावा नुसार आलेल्या प्रस्ताव सहाय्यक आयुक्त सतीश दिघे यांनी दिनांक1/9/2021 रोजी निकाली काढल्याने यावल नगरपालिकेला मोठी चपराक बसली आहे.
घनकचऱ्याचा प्रस्ताव निकाली काढल्याने मूळ मक्तेदारासह यावल शहरातील रंगीत भगव्या कलरच्या झेरॉक्स उपमक्तेदारास आणि घनकचऱ्यात लाच/टक्केवारी खाणाऱ्या यंत्रणेला मोठी चपराक बसली आहे.
घन कचरा वाहतूक करणाऱ्या ठेकेदाराने गेल्या महिन्यापासून बेकायदा घनकचरा वाहतूक केल्याने आणि बेकायदा यावल नगरपरिषद मालकीच्या घंटागाडी वापरल्याने यावल नगर परिषद प्रभारी मुख्याधिकारी व स्वच्छता विभाग निरीक्षक हे घन कचरा वाहतूक करणाऱ्या मक्तेदाराला कोणत्या नियमानुसार बिल अदा करणार आहे याकडे सुद्धा संपूर्ण यावल शहराचे लक्ष वेधुन आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *