महापौरांच्या उपस्थितीत शहरातील पत्रे उघडण्याच्या कार्यवाहीला सुरुवात!

Featured जळगाव
Share This:

जळगाव, – शहरातील टॉवर चौक ते सुभाष चौक परिसर नो व्हेईकल झोन जाहीर करण्यात आला असल्याने नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. नागरिकांची वाहन कोंडीतून सुटका व्हावी यासाठी महापौरांच्या नेतृत्वाखाली भाजपकडून निवेदन देण्यात आले होते.

मंगळवारी महापौर सौ.भारती सोनवणे यांच्याशी उपायुक्तांनी याबाबत चर्चा करून पाहणी केली. टॉवर चौकात महापौर सौ.भारती सोनवणे यांनी पत्रे उघडण्यासंदर्भात उपायुक्त संतोष वाहुळे यांच्याशी चर्चा केली. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, विशाल त्रिपाठी, राजू मराठे आदी उपस्थित होते.

जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशांचे पालन होईल आणि नागरिकांना त्रास होऊन वाहतूक कोंडी होणार नाही यासाठी टप्प्याटप्प्याने पत्रे उघडण्यात येतील असे उपायुक्तांनी सांगितले. पत्रे उघडताना काही ठिकाणी वाहने जाण्यासाठी आणि येण्यासाठी एकेरी मार्गाचा अवलंब करण्यात येईल असेही त्यांनी सांगितले.

महापौर सौ.भारती सोनवणे यांनी नागरिक व व्यापाऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने योग्य ती कार्यवाही तात्काळ करण्याचे सांगितले. भारतीय जनता पक्षाचे जिल्हाध्यक्ष दीपक सूर्यवंशी यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी याबाबत मनपा आयुक्तांना निवेदन दिले होते.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *