
पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री दुसऱ्या टप्प्यात घेणार लस
पंतप्रधान आणि सर्व मुख्यमंत्री दुसऱ्या टप्प्यात घेणार लस
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): 16 जानेवारीपासून संपूर्ण देशभरात लसीकरणाला सुरुवात झाली आहे. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान आणि राज्याचे मुख्यमंत्री लस कधी घेणार?, असा सवाल विचारला जात होता. परंतू आता याला पूर्णविराम लागला आहे. या मोहिमेचा दुसरा टप्पा लवकरच सुरु होणार आहे. या टप्प्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशातील सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना लस देण्यात येणार असल्याची माहिती समोर येतं आहे. तसंच, नंतरच्या टप्प्यामध्ये 50 वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या नेतेमंडळींचा समावेश असेल, अशी माहिती पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मुख्यमंत्र्यांबरोबर झालेल्या बैठकीत दिली आहे.
दरम्यान, शनिवारपासून या अभियानास सुरुवात झाली असून देशभरातील आरोग्य कर्मचाऱ्यांना पहिल्या टप्प्यात लस दिली जात आहे. लसीकरणासाठी केंद्र सरकारने तयार केलेले ॲप नीट चालत नसल्यानं राज्यातील लसीकरणाच्या मोहिमेत अडचणी येत आहेत.