पिंपळनेर पोलिस व्हॅन उलटून दोन जण किरकोळ जखमी- पहा विडिओ

Featured धुळे
Share This:
धुळे (तेज़ समाचार प्रतिनिधी) : धुळे तालुक्यातील पिंपळनेर गावात पोलीस व्हॅन रस्त्यावरून उलटून तीन पलटी खात रस्त्याच्या बाजूच्या कडेला फेकली गेली. यात टाटा सुमोचा चेंदामेंदा झाला. मोटरसायकल स्वराला वाचवण्यात चालकाचा वाहनावरील ताबा सुटल्याने हे वाहन उलटून मोठे नुकसान झाले.यात कोणीही पोलिस कर्मचारी जखमी झालेला नाही. किरकोळ जखमी झाल्याचे कळते त्यांना ग्रामीण रुग्णालयात तपासणी करता देण्यात आले दोघेजण गाडीत होते पो.कॉ.दिलीप बापू चौरे असे एकाचे नाव आहे. दुसऱ्याचे नाव समजले नाही. नागरिकांनी दोघेजण धुंद होते त्यातच हा अपघात झाला असा आरोप केला आहे.

याअगोदरही आझाद नगर पोलीस ठाणे हद्दीत रात्रीच्यावेळी अशाच प्रकारे एका आरोपीचा पाठलाग करताना पोलीस व्हॅन उभ्या ट्रकवर धडकून तिचे नुकसान झाले होते.यात तीन पोलीस कर्मचारी जखमी झाले होते.
चालकांचे प्रशिक्षण योग्य आहे की नाही हे तपासणे ही गरजेचे आहे या बाबीकडे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांत चर्चा सुरू होती.
Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *