
तलाठी,सर्कल यांच्यापेक्षा अवैध वाळू वाहतूकदारांची संख्या जास्त,ठोस निर्णय आणि कडक कारवाई आवश्यक
तलाठी,सर्कल यांच्यापेक्षा अवैध वाळू वाहतूकदारांची संख्या जास्त,ठोस निर्णय आणि कडक कारवाई आवश्यक.
एका ठिकाणी मंडप टाकून अवैध वाळू वाहतूक बंद होणार का?
यावल (सुरेश पाटील): तालुक्यात काही सर्कल,आणि तलाठी आपल्या मुख्यालया ठिकाणी रहात नसल्याने तसेच तालुक्यातील सर्कल आणि तलाठी यांची संख्या लक्षात घेता संपूर्ण यावल तालुक्यात वाळू वाहतूकदारांची व त्यांच्या वाहनांची संख्या दुपटीने आहे,रोजच्या प्रमाणे रविवार सुटीचे निमित्त साधून आज दि.6रविवारी सकाळी3वाजेपासून यावल तालुक्यात,शहरात सर्व विकसित कॉलन्यामध्ये अवैध वाळू वाहतूक सर्रासपणे सुसाट वेगाने सुरु होती, अवैध,अनधिकृत गौण खनिज वाळू वाहतूक रोखण्यासाठी तालुक्यात थोरगव्हाण मनवेल येथे यावल महसूल विभागातर्फे फक्त एका ठिकाणी एक मंडप टाकून वाळू वाहतूक करणाऱ्यांवर नियंत्रण आणण्याचा देखावा केला आहे,तालुक्यात फक्त एका ठिकाणी मंडप टाकून वाळू वाहतूक रोखण्याचा जो प्रयत्न केला आहे त्या ऐवजी त्या परिसरात तीन ते चार ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावल्यास आणि तालुक्यात इतर ठिकाणी शहरात आणि गावागावात मुख्य रस्त्यावर आणि चौका-चौकात लोकवर्गणीतून किंवा महसूल विभागाने शासकीय खर्च करून सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास सीसी कॅमेऱ्याच्या माध्यमातून शासनाला सतत 24 तासातील महत्वाच्या घडामोडी कार्यालयात एका ठिकाणी बसून समजतील आणि शासनाच्या तिजोरीत लाखो रुपयांचा दंड वसूल होईल,तसेच अवैध अनधिकृत गौण खनिज वाहतुकीला मोठ्या प्रमाणात आळा बसेल तसेच अतिमहत्वाचे महसूल अधिकारी कर्मचारी वर्गाचा शासकीय वेळ आणि खर्च वाचून नियमित कामांकडे जास्तीत जास्त लक्ष देता येईल.
बोरावल-भालशिव,पिप्री मार्गे,हडकाई- खडकाई नदीपात्रातून यावल शहरात व किनगाव परिसरात दररोज अनेक ट्रॅक्टर आणि डंपर अवैध वाळू वाहतूक करीत आहे,त्याप्रमाणे तालुक्यात इतर अनेक ठिकाणी प्रमुख नद्या नाल्यातून अवैध गौण खनिज वाळू माती सर्रासपणे वाहतूक सुरू आहे थोरगव्हाण वगळता तालुक्यात दुसऱ्या कोणत्याही ठिकाणी महसूलने एकही मंडप टाकलेला नाही,यावल शहरासह परिसरात तालुक्यात अवैद्य वाळू वाहतूक बंद करण्यासाठी ठिक-ठिकाणी किती मंडप लागतील याचा विचार महसूलने केला पाहिजे, मंडपात बसण्यासाठी आणि तलाठी कार्यालयात शासकीय कामे करण्यासाठी अधिकारी-कर्मचारी कोठून आणणार?हा महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला जात आहे,एकट्या थोरगव्हाण मनवेल येथे मंडप टाकून वाळू वाहतूक बंद होणार आहे का?बाकी इतर ठिकाणच्या अवैध वाळू वाहतुकीचे काय?तालुक्यात काही सर्कल आणि तलाठी हे आपल्या मुख्यालया ठिकाणी रहात नसल्याने अवैध वाळू आणि गौण खनिज वाहतूकदारांना सोयीचे ठरत आहे गस्ती पथक एका दिशेने गेले असता दुसऱ्या बाजूने वाळू वाहतूकदारांच्या वाहनांचा मोर्चा वळत असतो यावल शहरात ठिकठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे लावलेले आहेत त्या कॅमेऱ्यांमध्ये रात्रीच्या वेळी अवैध वाळू वाहतूक करणारे डंपर आणि ट्रॅक्टर दिसत नाहीत का?गौण खनिज बचावासाठी शासनाने ठिक-ठिकाणी प्रमुख रस्त्यावर आणि विकसित कॉलन्यामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविल्यास आणि त्याच्यावर लक्ष केंद्रित करून अवैध वाळू वाहतुक दारांवर कडक कारवाई केल्यास, अवैध वाळू वाहतुकीवर मोठ्या प्रमाणात नियंत्रण आणता येईल.असे संपूर्ण यावल तालुक्यात बोलले जात आहे.