कोविड केअर सेंटरच्या नाश्ताचा महापौरांनी घेतला आस्वाद

जळगाव
Share This:

अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी दररोज कोविड केअर सेंटरमध्ये करणार जेवण

जळगाव  (तेज समाचार डेस्क)– शहर मनपाच्या कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना दिल्या जाणाऱ्या जेवणाबाबत काही तक्रारी महापौरांकडे प्राप्त झाल्या होत्या. अन्नपदार्थांची गुणवत्ता तपासण्यासाठी बुधवारी महापौर भारती सोनवणे यांनी स्वतः सकाळी त्याठिकाणी नाश्ताचा आस्वाद घेतला.

कोविड केअर सेंटरमध्ये रुग्णांना पुरविल्या जाणाऱ्या जेवणाबाबत महापौरांकडे वेळोवेळी तक्रारी प्राप्त होत असल्याने बुधवारी सकाळी महापौर भारती सोनवणे स्वतः त्याठिकाणी पोहचल्या. यावेळी नगरसेवक कैलास सोनवणे, प्रशांत नाईक उपस्थित होते.

महापौर भारती सोनवणे यांनी कोविड केअर सेंटरमध्ये मिळालेल्या नाश्ताचा आस्वाद घेतला. बुधवारी सकाळी रुग्णांना उस, खाकरा व मोसंबी देण्यात आले होता. कोविड केअर सेंटरमधील जेवणाचा दर्जा आणि गुणवत्ता योग्य राहावी यासाठी महापौर स्वतः दररोज त्याठिकाणी नाश्ता आणि जेवण करणार आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *