
औरंगाबाद: स्थानिक गुन्हे शाखेने 5 दरोडेखोरांना पकडले
औरंगाबाद: स्थानिक गुन्हे शाखेने 5 दरोडेखोरांना पकडले
औरंगाबाद (तेज समाचार डेस्क): जिल्ह्यातील वैजापूर, गंगापुर तालुक्यात धुमाकूळ घालून लुटमार करणा-या पाच दरोडेखोरांना पकडण्यात स्थानिक गुन्हे शाखेला यश आले आहे. त्यांनी दोन शेतवस्त्यांवर दरोडा टाकून सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख हिसकावून नेली होती. वैजापुर तालुक्यातील शिवाजी कान्हे (रा. पालखेड) हे ३१ मार्च रोजी रात्री जेवण करुन झोपी गेले असताना सव्वाबाराच्या सुमारास त्यांना कुत्रा भुंकण्याचा आवाज आला. त्यामुळे ते दरवाजा उघडून घराबाहेर आले. तेवढ्यात दरोडेखोरांनी त्यांच्यासह पत्नीला मारहाण करुन सोन्या-चांदीचे दागिने आणि रोख हिसकावून नेली. तसेच १६ एप्रिल रोजी मध्यरात्री दीडच्या सुमारास गंगापुर तालुक्यातील संपत बाबुराव जगताप (६०, रा. गोपाळवाडी) यांना लाईट फुटल्याचा आवाज आल्याने ते घराबाहेर पडले.
त्याचवेळी दरोडेखोरांनी जगताप व त्यांच्या कुटुंबियांना मारहाण करुन दागिने व रोख रक्कम हिसकावली होती. या प्रकरणी अनुक्रमे वैजापुर व सिल्लेगाव पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. या दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी पोलिस अधीक्षक मोक्षदा पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पथके तैनात करण्यात आली. पथकाने तांत्रिक दृष्ट्या शोध घेतला. तेव्हा सचिन विरुपन भोसले (२२, रा. गाजगाव, ता. गंगापूर) याने साथीदारांच्या मदतीने दरोडे टाकल्याचे निष्पन्न झाले. त्यावरुन छापा टाकत त्याला गायरानात पकडण्यात आले. त्यानंतर त्याच्या मदतीने विरुपन भानू भोसले (५५), ताराचंद विरुपन भोसले (३५), शकतुर लक्ष्याहरी भोसले (२५, तिघेही रा. गाजगाव) आणि ज्ञानेश्वर रामनाथ चव्हाटे (३३, रा. पालखेड, ता. वैजापूर) यांना ताब्यात घेण्यात आले.
चौकशीदरम्यान ज्ञानेश्वर चव्हाटे व शिवाजी कान्हे यांच्यात शेतीच्या बांधावरुन वाद सुरू आहे. कान्हे यांच्याविरुध्द तक्रार देण्यासाठी चव्हाटे हा पोलिस ठाण्यात सोबतच गेला होता. त्यामुळे कान्हे हे चव्हाटेला शिवीगाळ करायचे. त्याचा राग मनात खदखदत होता. म्हणून चव्हाटेने ओळखीच्या विरुपन भोसलेला संपर्क साधून तीस हजार रुपये दिले. त्याला कान्हेंना धडा शिकवायचा म्हणून मारहाण करावी असे सांगितले होते. दरम्यान, पोलिसांनी विरुपन भोसलेकडून ९५ हजाराची रोख आणि दुचाकी असा ऐवज जप्त केला आहे. दरोडेखोरांचा शोध घेण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेचे निरीक्षक भागवत फुंदे, अनंत कुलकर्णी, उपनिरीक्षक भगतसिंग दुलत, संदीप सोळंके, सहायक फौजदार सुधाकर दौड, वसंत लटपटे, नवनाथ कोल्हे, विक्रम देशमुख, रतन वारे, विठ्ठल राख, संजय काळे, नामदेव सिरसाठ, प्रमोद खांडेभरा, धीरज जाधव, संजय देवरे यांच्यासह इतरांनी परिश्रम