दिल्ली आणि केरळ यांसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यात याव्या

Featured जळगाव
Share This:

दिल्ली आणि केरळ यांसह देशभरातील हिंदूंच्या हत्या रोखण्यात याव्या !

भुसावळ येथील साहाय्यक प्रांताधिकारी राहुल नाईक यांना निवेदन देतांना हिंदुत्वनिष्ठ !

यावल ( सुरेश पाटील): समस्त हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी निवेदने सादर केले त्यात म्हटले आहे की काही वर्षांत देशभरात विविध हिंदुत्ववादी संघटनांचे नेते आणि कार्यकर्ते यांच्यावर प्राणघातक आक्रमण करणे, त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करणे, तसेच त्यांना वेचून, पाळत ठेवून ठार मारणे अशा घटनांत लक्षणीय वाढ झाली आहे. नुकतेच दिल्ली आणि केरळ येथे हिंदूंंच्या हत्या झाल्या आहेत.
या संदर्भात प्रशासनाचे लक्ष वेधून घेण्यासाठी हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्ववादी संघटनांच्या वतीने जळगावसह जिल्ह्यातील भुसावळ,एरंडोल, यावल,अमळनेर,चोपडा,धरणगाव येथील तहसीलदार यांना आज ४ मार्च 2021 रोजी निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की,

1. दिल्ली येथे श्रीराम जन्मभूमी मंदिरासाठी निधीसंकलन करणार्‍या रिंकू शर्मा या हिंदू युवकाची मुसलमान युवकांकडून चाकू मारून हत्या करण्यात आली. देशाच्या राजधानीत अशा घटना दिवसढवळ्या घडत असतील, तर अन्यत्र काय स्थिती असेल, याचा विचारच करू शकत नाही.

2. दिल्ली येथील घटनेतील रिंकू शर्माच्या कुटुंबियांचे सांत्वन चालू असतांनाच केरळ येथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राहूल कृष्णा उर्फ नंदू याची पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाच्या कार्यकर्त्यांकडून हत्या करण्यात आली आहे. केरळमध्ये अशा शेकडो हत्या गेल्या काही वर्षांमध्ये झालेल्या आहेत.

3. अशाप्रकारे हिंदू नेत्यांच्या हत्या होण्याचे प्रमाण विशेष करून केरळ, तमिळनाडू, कर्नाटक आणि बंगाल या राज्यांत लक्षणीय आहे. हे लोण देहली, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश आदी राज्यांतही पोचले असून केवळ हिंदुत्वाचे काम करणार्‍या कार्यकर्त्यांना जाणीवपूर्वक लक्ष्य करण्यात येत आहे.

4. दिनांक 4 ऑक्टोबर 2020 या दिवशी बंगालमधील उत्तर 24 परगना जिल्ह्यातील टीटागड नगरपालिकेचे भाजप नगरसेवक मनीष शुक्ला यांची निर्घुण हत्या करण्यात आली.

5. मा. गृहमंत्री श्री. अमितभाई शहा यांनी बंगालमधील त्यांच्या भाषणात भाजपच्या 300 कार्यकर्त्यांच्या हत्या झाल्याचे म्हटले होते. देशाच्या गृहमंत्र्यांनी घोषित केलेली आकडेवारी ही निश्‍चितच चिंताजनक आहे.

6. भोपाळ येथील भाजपचे नगरपालिका अध्यक्ष प्रल्हाद बंदवार, मंदसौर येथील विश्‍व हिंदु परिषदेचे कार्यकर्ते युवराज सिंह चौहान, रतलाम येथील भाजप कार्यकर्ता तथा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पदाधिकारी हिंमत पाटील, बरवानी येथील भाजप नेते मनोज ठाकरे इत्यादी मध्यप्रदेशातील हत्यांची यादीही न संपणारी आहे.

7. दिनांक 30 जुलै 2018 या दिवशी केरळ राज्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे कार्यवाह राजेश (वय 34) यांची साम्यवादी कार्यकर्त्यांनी चाकूने भोसकून हत्या केली. राजेश यांची हत्या करण्यापूर्वी त्यांचे हात कापण्यात आले, तर त्यांच्या शरीरावर

15 वार करण्यात आले होते. ही हत्या सीपीआय (एम्) पक्षाच्या गुंडांनी केली.

8. कर्नाटक राज्यातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्वयंसेवक शरद मडीवाला, रूद्रेश, कुट्टप्पा, प्रवीण पुजारी आणि राजू यांच्या हत्या झाल्या आहेत. यांतील काहींचे मारेकरी पकडले असून काहींचे अद्यापही फरार आहेत. ‘पॉप्युलर फ्रन्ट ऑफ इंडिया (पीएफ्आय)’च्या म्हैसूरू येथील अबिद पाशा आणि त्याच्या टोळीने रा.स्व. संघ अन् भाजप यांच्या 8 हिंदुत्वनिष्ठ कार्यकर्त्यांच्या क्रूर हत्या केल्याचे अन्वेषणात उघड झाले आहे.

9. बंगाल मध्ये मे 2018 मध्ये 18 वर्षांच्या त्रिलोचन या भाजप कार्यकर्त्याचे प्रेत झाडावर टांगून ‘भाजपसाठी काम करणार्‍यांचे हीच अवस्था होईल’, असे पोस्टर लावण्यात आले होते. यानंतर केवळ दोन दिवसांत 32 वर्षीय दुलाल कुमार यांचेही प्रेत विजेच्या खांबाला लटकवण्यात आले होते. या हत्या केवळ हत्या नसून हत्यांचे षड्यंत्रच असल्याचे सिद्ध करतात.

आतापर्यंतच्या या हत्यांमध्ये गुन्हेगार कोण आहेत ?, हे विविध अन्वेषण यंत्रणांना स्पष्ट असूनही संबंधित राज्य शासनाकडून या प्रकरणांमध्ये ठोस कारवाई होतांना दिसत नाही. या हत्या रोखण्यासाठी त्या त्या राज्यातील पोलीस तपासात दिरंगाई करत असल्याचेही दिसून येत आहे. यामुळे आक्रमणकर्त्यांचे मनोबल वाढत आहे. पोलीस आणि तेथील राज्य सरकार या हत्यांचा तपास दडपण्याचा प्रयत्न करतात. देशभरात होत असलेल्या हिंदु नेत्यांच्या अशा हत्या एका व्यापक सुनियोजित कटाचा भाग असल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

तरी या हत्या करणारे धर्मांध, त्यांच्याकडून हत्या करवून घेणारे सूत्रधार, तसेच ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे यांचा माग काढून त्यांच्यावर कारवाई व्हावी, यासाठी या प्रकरणांची केंद्रीय अन्वेषण विभागाकडून सखोल चौकशी करणे अत्यावश्यक बनले आहे.

या संदर्भात आमच्या पुढील मागण्या आहेत –

1. दिल्ली आणि केरळ यांसह देशभरात गेल्या काही वर्षांत झालेल्या हिंदूंच्या हत्यांमागील सूत्रधार, यांत सहभागी गुन्हेगार, या हत्यांमध्ये साहाय्य करणारे धर्मांध यांच्यावर, तसेच ही प्रकरणे दडपण्यासाठी प्रयत्न करणारे पोलीस वा राजकीय नेते यांचा माग काढून त्यांच्यावर कठोर कारवाई व्हावी.

2. अशा प्रकरणांची चौकशी करण्यास राज्य शासन अपयशी ठरत असल्याने या आक्रमणांच्या घटनांचा सखोल तपास ‘केंद्रीय अन्वेषण यंत्रणे’कडे द्यावा. देशभरातील या हत्यांची ‘मोडस ऑपरेंडी’चा अभ्यास करून या षड्यंत्राचा पर्दाफाश करावा.

3. या तपासासाठी कालबद्ध कार्यक्रम निश्‍चित करावा, तसेच आवश्यकतेनुसार यासाठी केंद्रीय स्तरावर एका विशेष समितीचे गठन करावे.

4. देशभरातील हिंदुत्ववादी नेत्यांना तात्काळ राज्यात आणि राज्याबाहेर सुरक्षा पुरवण्याचे आदेश केंद्र शासनाने द्यावेत.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *