यावल नगरपरिषदेच्या राजकारणात अपक्षांचा प्रभाव

Featured जळगाव
Share This:

यावल नगरपरिषदेच्या राजकारणात अपक्षांचा प्रभाव.

अक्षयतृतीया आनंदात तर रमजान ईद नाराजीत.

7सदस्य वगळून14सदस्यांना दिड पेटी सांजोरी आणि शीरखुर्म्याचा गोडवा.

यावल (सुरेश पाटील): यावल नगरपरिषदेच्या राजकारणात राजकारणाच्या जोरावरच7सदस्यांना डावलून14नगरसेवकांना विविध विकास कामांच्या माध्यमातून प्रत्येकी दीड पेटी सांजोरी आणि शीरखुर्म्याचा गोडवा अक्षय तृतीया आणि रमजान ईद निमित्त2दिवस आधीच म्हणजे दि.12बुधवार रोजी वाटप करण्यात आला.इतर सदस्यांना डावलण्यात आल्याने यावल नगरपालिका काही सदस्यांची अक्षयतृतीया आनंदात तर काही सदस्यांची रमजान ईद नाराजीत जाणार असल्याचे राजकारणात बोलले जात आहे.
महाराष्ट्रात आघाडी सरकारची सत्ता आहे मात्र यावल नगरपरिषदेत राष्ट्रवादी काँग्रेस, भारतीय जनता पार्टीचे काही कट्टर समर्थक पदाधिकारी अपक्ष म्हणून सदस्य आहेत,काँग्रेसचे अधिकृत7 सदस्य आहेत(त्यातील एक सदस्य विकासाच्या नावाखाली भाजप नेतृत्वाखालील दावणीला बांधला गेला आहे असो राजकारणात विकासाच्या नावाखाली सर्व काही चालत.)तर अपक्ष2स्विकृत सदस्य आणि1शिवसेना सदस्य आहेत असे नगरपरिषदेतील बलाबल असले तरी नगरपालिकेत मात्र आघाडी सरकारच्या ध्येय धोरणाना पद्धतशीरपणे बगल देण्यात आली आहे,नगरपरिषद महिला सदस्यांच्या कामकाजात काही महिला सदस्यांचे पती मात्र98टक्के हस्तक्षेप करीत असल्याचे खुद्द काही न.पा. सदस्यांमध्ये बोलले जात आहे राजकारण काहीही असो यावलकरांना दर्जात्मक विकास कामे हवी आहेत.
नगरपालिकेतील एकूण सदस्यांपैकी फक्त14सदस्यांना दीड पेटी/सांजोरी आणि शीरखुर्म्याचा गोडवा वाटप केल्याने आणि 7सदस्यांसह2स्विकृत सदस्यांना विश्वासात न घेता चहा पाण्यासाठी सुद्धा विचारपूस न केल्याने यावल शहरात नगरपालिका राजकारणात अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत,दीड पेटी वाटपात कोणकोणते ठेकेदार सहभागी होते तसेच त्यांच्या कामांची गुणवत्ता यावल नगरपरिषदेतील बांधकाम शाखा अभियंता मदने यांनी तपासली आहे का?किंवा खुर्चीवर बसून काम पूर्ण केल्याचे दाखविले आहे का?तसेच यावल नगरपरिषदेत कार्यालयीन कामकाजात काही महिला न.पा. सदस्यांचे पती आपल्या पतीच्या पदाचा,अधिकाराचा दुरुपयोग करून कार्यालयीन कर्मचाऱ्यांवर आणि ठेकेदारांवर प्रभाव टाकून सोयीनुसार, मर्जीनुसार कामे करून घेत आहेत का?रस्ते गटारी इत्यादी कामे मंजूर प्लॅन इस्टिमेट नकाशाप्रमाणे गुणवत्तापूर्ण झाली आहे की निकृष्ट प्रतीची झाली आहे याची सखोल चौकशी कर्तव्यदक्ष मुख्याधिकारी बबन तडवी यांनी करावी अशी मागणी संपूर्ण यावल शहरातून होत आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *