
शिरपूर येथे पार पडला कोळी समाजाचा आदर्श विवाह
शिरपूर येथे पार पडला कोळी समाजाचा आदर्श विवाह
शिरपूर (तेज समाचार प्रतिनिधि): कोरोना महामारीमुळे लग्न समारंभावर यावर्षी खऱ्या अर्थाने विघ्न आणले. विषाणूचा सामूहिक प्रादुर्भाव होण्याची भीती पाहता लॉकडाऊन काळात लग्नसोहळ्यासारख्या सार्वजनिक समारोहवर बंदी घालण्यात आली आणि अनेकांच्या आनंदावर विरजण पडले. परिस्थितीच तशी असल्याने पर्याय नव्हता. त्यामुळे अनेकांनी यावर्षी ठरलेले मुहूर्ताचे लग्न रद्द केले किंवा पुढे ढकलले. काहींनी मात्र ठरलेली तारीख टाळण्याऐवजी असलेल्या परिस्थितीत अत्यल्प लोकांच्या उपस्थितीत लग्नकार्य उरकवून घेतले. हो पण थाटामाटात लग्न करण्याचा मोह त्यांना टाळावा लागला
श्री,अभिमन दौलत देवरे,रा,भाटपुरा ह,मु शिरपूर.यांचे जेष्ठ चिरंजीव चि.सागर अभिमन देवरे व असली येथील रावसाहेब शिवाजी सावळे यांची चतुर्थ सुकन्या चि,सौ,पुजा रावसाहेब सावळे व यांचा शुभ विवाह दि,१५/६/२०२० रोजी दु ११ वा शासनाच्या नियमाप्रमाणे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत व सोशल डिस्टसिंगचे पालन करत आदर्श असा विवाह सोहळा शिरपूर येथे पार पडला…
या विवाह सोहळ्यास भाजपा सोशल मीडिया शहरप्रमुख हिराभाऊ कोळी, ईश्वर सोनवणे,सोनु देवरे, युवराज सावळे,व मित्र परिवार उपस्थित होते