
पुण्यात लॉकडाऊनच्या काळातच वाढले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
पुण्यात लॉकडाऊनच्या काळातच वाढले कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण
पुणे (तेज समाचार डेस्क) : पुण्यात 14 जुलैपासून लोकडाऊन सुरू आहे. पण लॉकडाऊनच्या या काळातच पुण्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या नोंद झालीय आणि आतापर्यंतचे मृत्यूही याच कालावधीत नोंदले गेलेत. त्यामुळं पुण्यातील लॉकडाऊन अपयशी ठरल्याचा आरोप होऊ लागलाय.
14 जुलै ते 21 जुलै या कालावधीत पुणे जिल्ह्यात 16561 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडलेत तर 344 रुग्णांचा या कालावधीत कोरोनामुळे मृत्यू झालाय. लॉकडाऊनच्या या कालावधीत पुण्यातील आतापर्यंतची सर्वाधिक रुग्णसंख्या आणि मृत्यूंची संख्या नोंदवली गेलीय. या आकडेवारीवरून पुण्यातील लॉकडाऊन अपयशी ठरल्याचं बोललं जातय. या लॉकडाऊनचा मुख्य उद्देश कोरोना संसर्गाची समूह साखळी तोडणं हा असल्याचा दावा करण्यात आला होता. पण मागील सात दिवसांमधील कोरोना रुग्णांची वाढलेली आकडेवारीवरून ही साखळी तोडण्यात यश आलेलं नाही. दरम्यान, व्यापारी संघटनेने या लॉकडाऊनला सुरुवातीपासूनच विरोध केला होता आणि आता 23 तारखेनंतर तो पुढे वाढवण्यात आला तर त्या विरोधात आपण आंदोलन करू, असा इशारा व्यापाऱ्यांनी दिलाय.