
कोविड टाळेबंदीत मानवतेचा हात
नानाश्री प्रतिष्ठान तर्फे उतरकरु कुटुंबियांना मदत
चोपडा – येथील कारगिल चौक भागात छत्तीसगड व विदर्भातून उतकरु म्हणून आलेले व मिळेल ते काम करुन आपल्या कुटुंबियांची पोटाची खळगी भरणाऱ्या ४५ कुटुंबांना चोपडा तालुक्यात नेहमीच सामाजिक कार्य करणाऱ्या नानाश्री प्रतिष्ठान तर्फे तांदुळ वितरीत करण्यात आला.प्रतिष्ठानचे अध्यक्ष व पत्रकार श्रीकांत नेवे,सचिव रुपेश नेवे सर,सदस्य सतिष नेवे तसेच राजेंद्र नेवे,सागर नेवे,सौरभ नेवे यावेळी उपस्थित होते.टाळेबंदीच्या काळात या कुटुंबियांना रोजगार नाही.कोणतेही कमाईचे साधन नसल्यामुळे अडचणीत असलेल्या गरजूंना नानाश्री प्रतिष्ठानने मानवतेच्या भावनेतून केलेल्या या मदतीचे कौतुक होत आहे.