
शिरपुर: पाेलिस पाटील यांनी निर्धास्त काम करावे शासन त्यांच्या पाठीशी : उपविभागीय अधिकारी विक्रमसिंह बांदल
पाेलिस पाटील यांनी निर्धास्त काम करावे शासन त्यांच्या पाठीशी : उपविभागीय अधिकारी विक्रमसिंह बांदल
पाेलिस पाटील यांचे : विमा कवच व मानधन साठी निवेदन
शिरपुर (तेज़ समाचार प्रतिनिधी) : काेराेना महामारीत ग्रामीण भागात पाेलिस पाटील यांचे काम काैतुकास्पद आहे त्यांनी निर्धास्त काम करावे. शासनाचे काेराेना काळातील विमा सुरक्षा कवच सह सर्व सुविधांचा लाभ पाेलिस पाटील यांना देखील मिळणार आहे. म्हणुन मनात कुठल्याही प्रकारची शंका न ठेवता ग्रामीण भागात काेराेना विषाणूचा प्रादुर्भाव राेखण्यासाठी कठाेर मेहनत घ्यावी. तसेच शेतीकामासाठी बाहेर गावाहुन येणारे शेतमजूर तर गावातील वाड्या वस्त्या वर जावुन मास्क, सॅनिटाइजर, साेशल डिस्टन्सिंग या बाबत लाेकांना जागृत करावे. तर लग्न, प्रेत यात्रा, गावातील चाैक, दुकाने, मंदीर अथवा सार्वजनिक ठिकाणी गर्दी हाेणार नाही म्हणून विशेष काळजी घ्यावी. श्रावण मास चालु असल्याने प्रत्येकाने कुठेही न जाता घरीच पुजा करावी. तर गावात कुणी नियम पाळत नसल्यास संबंधित व्यक्ती विरोधात कायदेशीर कार्यवाही करावी. वेळाेप्रसंगी अशा लाेकांवर गुन्हा दाखल करण्यात येईल. अशा सुचना शिरपुरचे उपविभागीय अधिकारी विक्रमसिंह बांदल यांनी पाेलिस पाटील संघटनेच्या पदाधिकारी यांना चर्चा करतांना दिल्या.
राज्यातील पाेलिस पाटील यांना जानेवारी महिन्यापासून मानधन मिळाले नाही. तर काेराेना काळात पाेलिस पाटील बांधव ग्रामीण भागात अहाेरात्र काम करीत आहेत. त्यांना शासनाचे काेराेना काळातील विमा सुरक्षा कवच मिळावे तर मानधन दरमहा वेळेवर देण्यात यावे यासह विविध समस्या सोडविण्यासाठी पाेलिस पाटील संघटनेच्या वतीने दि. २५ रोजी शिरपुरचे उपविभागीय अधिकारी विक्रमसिंह बांदल यांना निवेदन देण्यात आले. निवेदनाचा आशय असा की, काेविड १९ सारख्या महामारीत पाेलिस पाटील यांना सामाजिक अंतर पाळणे, बाहेरून येणाऱ्या व्यक्तीवर लक्ष ठेवणे, आराेग्य विभाग यांच्या मदतीला धावणे, गावातील तंटे मिटविणे अशा अनेक गाेष्टींना सामाेरे जावे लागत आहे. अशा प्रसंगी पाेलिस पाटील यांना काेराेना बाधा झाल्यास अथवा उपचारार्थ मुत्यु झाल्यास कुंटुब उघड्यावर येण्याची शक्यता नाकारता येत नाही. तसेच पाेलिस पाटील यांचे मानधन सहा महिने आठ महिने उशिरा मिळत असते म्हणुन उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण हाेताे. यासाठी मानधन दरमहा मिळावे.
निवेदनावर छाेटुलाल पाटील धुळे जिल्हाअध्यक्ष, एकनाथ राठोड भाटपुरा पाेलिस पाटील, पंडीतराव पाटील दहिवद, जयपालसिंह गिरासे पिंप्री पाे. पा., राजकिरण राजपूत आढे, दिपक सनेर ताजपुरी, नितिन जाधव बभळाज आदी पाे. पा. संघटनेच्या पदाधिकारी यांच्या सह्या आहेत. यावेळी पिंप्रीचे पाेलिस पाटील जयपालसिंह गिरासे यांनी पाेलिस पाटील यांना कामात येणाऱ्या अडचणी सविस्तर मांडल्या तर आढे व ताजपुरी येथील पाेलिस पाटील यांनी विविध समस्या सांगितल्या यावेळी प्रात अधिकारी बांदल यांनी अनेक विषय चर्चच्या माध्यमातून साेडविले. तर पाेलिस पाटील यांच्या साठी २४ तास उपलब्ध असुन कामात काहीही अडचण असल्यास तात्काळ संपर्क करावा अशी ग्वाही दिली.