श्री मनुदेवी मंदिर चैरीटेबल ट्रस्ट यांची पहिली सभा रविवार दि.25रोजी श्री मनुदेवी मंदिरात पोलिस बंदोबस्तात होणार?- आधीच्या ट्रस्टला कायदेशीर मोठी चपराक

Featured जळगाव
Share This:

श्री मनुदेवी मंदिर चैरीटेबल ट्रस्ट यांची पहिली सभा रविवार दि.25रोजी श्री मनुदेवी मंदिरात पोलिस बंदोबस्तात होणार?

आधीच्या ट्रस्टला कायदेशीर मोठी चपराक.

संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांच्या प्रयत्नांना कायदेशीर यश.

यावल (सुरेश पाटील): गेल्या महिन्यात17जून2021 रोजी धर्मादाय उपायुक्त जळगाव यांनी आडगाव तालुका यावल येथील संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांच्या श्री मनुदेवी मंदिर चैरीटेबल ट्रस्टला नोंदणी क्र.’A’ 1367देऊन नोंदणी केल्याने यामुळे गेल्या30वर्षापासून सातपुड्याच्या पायथ्याशी असलेल्या श्री मनुदेवी मंदिराचा कारभार पाहणाऱ्या निलंबित पोलीस पाटील शांताराम राजाराम पाटील यांच्या सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठानला कायद्याचा मोठा धक्का बसला आहे.त्यामुळे संत श्री महाहंसजी महाराज यांच्या नव्या ट्रस्टमध्ये आणि निलंबित पोलिस पाटील शांताराम राजाराम पाटील यांच्या या दोघा ट्रस्ट मधील आपआपसातील वर्चस्वामुळे श्री मनुदेवी मंदिर देवस्थानात कामकाज करताना आणि मिटींग/सभा घेताना वाद-विवाद निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्था तसेच शांततेचा भंग होऊ नये म्हणून संत श्री महाहंसजी महाराज यांनी यावल पोलिसांसह संबंधित सर्व अधिकार्‍यांकडे निवेदन देऊन संरक्षणाची मागणी केली आहे.
दि.21बुधवार2021 रोजी संत श्री महाहंसजी महाराज रा.आडगाव ता.यावल यांनी यावल पोलीस निरीक्षक यांच्यासह संबंधित सर्व अधिकाऱ्यांसह प्रधानमंत्री,गृहमंत्री दिल्ली, महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांच्यासह संबंधितांना ई-मेल द्वारा दिलेल्या लेखी निवेदनात म्हटले आहे की,
दि.25जूलै2021रोजी सकाळी11वाजता श्री मनुदेवी मंदिर चॅरिटेबल ट्रस्ट आडगाव तालुका यावल जिल्हा जळगावच्या विश्वस्त मंडळाची प्रथम सभा सदर ट्रस्ट तर्फे श्री मनुदेवी मंदिर(वन कक्ष149)येथे आयोजित करण्यात आली आहे.संदर्भ’1’अन्वयेच्या तक्रारी सोबत आपल्याकडे धर्मादाय उपायुक्त साहेब जळगाव यांचे दि.17/6/2021रोजीच्या आदेशाची प्रत सादर केली आहे.त्या आदेशानुसार उक्त न्यासाच्या मसुदा योजनेस मंजुरी देणे वगैरे संबंधात सदर सभा आयोजीत केली आहे.सदर न्यासाचे अधिकृत विश्वस्त 31असून2विश्वस्त मयत असल्याने29विश्वस्तांना सभेचे सूचना पत्र देण्यात आले आहे. त्याची प्रत आपल्या माहितीसाठी सोबत सादर आहे.श्री मनुदेवी मंदिराचे न्यास नोंदणी प्रमाणपत्र मिळाले असल्याने सदर न्यासाच्या संबंधात श्री मनुदेवी मंदिर येथेच सभा घेणे आवश्यक व उचित आहे.सदर सभेचे आयोजन कोरोना निर्बंधाचे नियमानुसार केले आहे.सभेचे आयोजन व उद्देश कायदेशीर आहेत.त्यामुळे सभा मनुमातेच्या सन्मुख निर्विघ्नपणे संपन्न होणे अपेक्षित व आवश्यक आहे.परंतु अर्जदाराच्या उक्त न्यासाचे विरोधक असलेले निलंबित पोलीस पाटील शांताराम राजाराम पाटील,अध्यक्ष सातपुडा निवासिनी श्री मनुदेवी सेवा प्रतिष्ठान,तालुका जळगाव यांचे कडून व त्यांचे हस्तकां-कडून सदर कायदेशीर सभेला व्यत्यय निर्माण होण्याची व सभेचे आयोजक,सदस्य व स्वयंसेवक यांच्या जिवीत,शारीरिक सुरक्षतेस व त्यांच्या वाहन वगैरे जंगम मालमत्तेच्या सुरक्षतेस जबर धोका होण्याची तथा हानी पोहोचविण्याची दाट शक्यता आहे.संदर्भ1ते4अन्वयेच्या तक्रारीनुसार व सदर निलंबित पोलीस पाटील व त्यांचे सहकारी यांचे विरुद्ध पूर्वीचे दाखल व न्यायप्रविष्ट असलेले अनेक गुन्हेवृत्तांनुसार त्यांच्याकडून सदर संभावित धोका सभेपूर्वी, सभेदरम्यान व सभेपश्चात केव्हाही होऊ शकतो.यास्तव सदर संभावित धोका निवारणासाठी संबंधीतांविरुद्ध प्रतिबंधात्मक कारवाई होणे अत्यावश्यक असून सदर सभेच्या दिवशी म्हणजे दि.25जुलै2021रोजी पूर्ण एक दिवस आपल्या पोलिस स्टेशन कडून पोलिस संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे.त्यासाठी पोलिस निरीक्षक साहेब व त्यांचे
अधिनस्त सुरक्षारक्षक दल संरक्षण स्वरूपात मिळणे अत्यावश्यक व अपेक्षित आहे.जर सदर पोलिस संरक्षण मोफत देऊ शकत नसाल तर सदर पोलिस संरक्षण कामी लागणारे कायदेशीर शुल्क वैयक्तिकरित्या भरण्यास तयार आहेत.आपण शुल्क रक्कम जमा करावी व खालील स्वाक्षरी कर्ते यांना त्याची पावती देऊन त्वरित पोलीस संरक्षण पुरविण्याची योग्य ती कारवाई करावी ही नम्र विनंती केली आहे.
तसेच१)अनधिकृत हस्तक्षेपकांना प्रतिबंधित न केल्यास कायदा सुव्यवस्था भंग होण्याची व कोरोना निबंध भंग होण्याची दाट शक्यता आहे.म्हणून पोलिस संरक्षण मिळणे अत्यावश्यक आहे.
२) विरोधक ट्रस्टचे ट्रस्टींची ऑनलाईन सचित्र नाव सुचि योग्य त्या कारवाईसाठी देत आहे.असे ई-मेल द्वारे दिलेल्या निवेदनात संत श्री बाबा महाहंसजी महाराज यांनी म्हटले आहे.तरी यावल पोलिसांकडून संत श्री महाहंसजी महाराज यांच्या अधिकृत नोंदणी झालेल्या ट्रस्टच्या कामकाजासाठी यावल पोलिसांकडून बंदोबस्त मिळतो किंवा नाही तसेच गेल्या30 वर्षापासून श्री मनुदेवी मंदिराचे कामकाज पाहणारे ट्रस्टी आपली भूमिका काय घेतात?याकडे संपूर्ण यावल तालुक्यात सह खानदेशातील श्री मनुदेवी भाविक,भक्त गणाचे, नागरिकांचे लक्ष वेधून आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *