
अंतिम वर्षाच्या परिक्षेवर केंद्र स्तरातून ‘हा’ मोठा निर्णय येण्याची शक्यता
अंतिम वर्षाच्या परिक्षेवर केंद्र स्तरातून ‘हा’ मोठा निर्णय येण्याची शक्यता
नवी दिल्ली (तेज समाचार डेस्क): अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्याच्या मुद्द्यावर महाराष्ट्रात बराच सावळा गोंधळ पहायला मिळाला. मात्र आता केंद्रीय स्तरावरही अंतिम वर्षाच्या परिक्षा रद्द करण्यासाठीच्या हालचालीस युजीसीने सुरूवात केली आहे. केंद्रीय मनुष्यबळ मंत्रालयास यासंबंधी लवकरच आदेश मिळण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.अंतिम वर्ष वगळता इतर वर्गांच्या परिक्षा घेण्यासाठी युजीसीने याआधी काही सोप्या नियमावली दिल्या होत्या. अंतिम वर्षांच्या विद्यार्थ्यांना परिक्षा द्याव्या लागतील असंही युजीसीकडून स्पष्ट करण्यात आलं होतं. मात्र कोरोनाच्या प्रादुर्भाव परिक्षा घेणं शक्य नसल्यानं युजीसी हा निर्णय बदलण्याची दाट शक्यता आहे.
केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री रमेश पोखरियाल यांनीही ट्विट करत अंतीम वर्षांच्या परिक्षांसाठी नवा निर्णय लवकरच जाहीर केला जाईल असं सांगितलं आहे. यामुळे देशभरातील विद्यापीठांच्या परिक्षा रद्द होण्याची शक्यता आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र,हरियाणा व ओडिशा या राज्यांनी याआधीच अंतिम वर्षांच्या परिक्षा न घेण्याचा निर्णय घेतला आहे.