Yawal news

भरदिवसा वाळूची तस्करी करणारे डंपर यावल महसूल पथकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले

Featured जळगाव
Share This:

भरदिवसा वाळूची तस्करी करणारे डंपर यावल महसूल पथकाने पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले.

आज दि.22 रोजी दुपारची घटना.

यावल (सुरेश पाटील) : 22मार्च2021सोमवार रोजी दुपारी 3 वाजेच्या सुमारास अनधिकृत वाळू वाहतूक करणारे डप्पर जळगाव– आसोदा–भादली–शेळगाव मार्गे टाकरखेडा– बोरावल कडून यावल कड़े येत असताना बोरावल गेट पासून अर्धा किलोमीटर अंतरावरील नगरपरिषदेच्या घनकचरा प्रकल्पाजवळ जुना भालशिव रस्त्याकडे ड्रायव्हरने डंपरMH19-5888हा पळवून नेला त्याचा पाठलाग पथकाने केला असता डंपर चालकाने डंपरसह पळून जाण्याच्या प्रयत्नात डंपर मधील वाळू वाळू तात्काळ रस्त्यावर फेकून दिली व पळण्याचा प्रयत्न केला.ती वाळू जेसीबी मशीन बोलावून पुन्हा त्या डंपर मध्ये भरून ते डंपर यावल पोलीस स्टेशनला आणून जमा केले. प्रभारी तहसीलदार आर.डी.पाटील व निवासी नायब तहसिलदार आर.के.पवार,मंडळ अधिकारी शेखर तडवी,तलाठी यावल ईश्वर कोळी,शिपाई रामा कोळी यांनी पंचनामा करून व कारवाई करून यावल पोलीस स्टेशनला वाळू डंपर जमा केले आहे. या कारवाईमुळे वाळू वाहतूक धारांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
तसेच यावल शहरात रात्रीच्या वेळेस व रात्रीच्या वेळेस दोन ते सहा वाजेच्या दरम्यान विकसित भागातून वाळूचे अनेक ट्रॅक्टर सुसाट वेगाने धावून मोठा धुमाकूळ घालून वाळू तस्करी जोरात करीत आहेत. यांच्यावर सुद्धा यावल महसूलने कड़क कारवाई करावी असे संपूर्ण यावल शहरात बोलले जात आहे आहे.

Share This:

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *